मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी 'वन डे' या चित्रपटात ते भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अनुपम खेर यांच्यासोबतच ईशा गुप्ता आणि कुमूद मिश्रा यांचेही लूक पाहायला मिळत आहेत.
चित्रपटाच्या नव्या पोस्टरसोबतच ट्रेलरबद्दलही माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशोक नंदा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनुपम खेर यांचा हा चित्रपट येत्या १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
![one day](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3333488_anupam.jpg)
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. 'जस्टीस डिलिव्हर्ड', 'प्रत्येक गुन्ह्यामागे एक कथा दडलेली असते', अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली होती. दरम्यान, या चित्रपटात अनुपम खेर हे वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती केतन पटेल आणि स्वाती सिंग यांनी केली आहे.