ETV Bharat / sitara

'कबीर सिंग'चं नवं पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी ट्रेलर येणार प्रेक्षकांच्या भेटीस - shahid kapoor

या पोस्टरमध्ये शाहिदसोबतच चित्रपटातील कियारा अडवाणीचा लूकही पाहायला मिळत आहे. या पोस्टरसोबत चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

'कबीर सिंग'चं नवं पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : May 8, 2019, 3:24 PM IST

मुंबई - अभिनेता शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अशात आता चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

या पोस्टरमध्ये शाहिदसोबतच चित्रपटातील कियारा अडवाणीचा लूकही पाहायला मिळत आहे. या पोस्टरसोबत चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १३ मे ला चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशात प्रेक्षक या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

kabir singh
'कबीर सिंग'चं नवं पोस्टर प्रदर्शित

'कबीर सिंग' हा चित्रपट दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचे दिग्दर्शक संदिप रेड्डी वंगा या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटात शाहिद एका यशस्वी मेडिकल सर्जनची भूमिका साकारत आहे. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

entertainment

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.