मुंबई - अभिनेत्री राधिका आपटे अनेक वेगळ्या आशयाच्या चित्रपटांतून आणि निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिच्या या चित्रपटांचं विशेष कौतुकही होतं. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'अंधाधून' सिनेमातही तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्सनं ट्विट करत राधिकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अंधाधूनच्या संपूर्ण टीमचं राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन. आम्ही असं नाही म्हणत, की या चित्रपटात राधिका आपटे आहे म्हणून त्याला हा पुरस्कार मिळाला. पण हो यात राधिका आपटे आहे, असं नेटफ्लिक्सनं म्हटलं आहे.
-
Congratulations to Andhadhun on winning the National Award for Best Hindi film. We're not saying this because Radhika Apte is in it but yes Radhika Apte is in it.#NationalFilmAwards
— Netflix India (@NetflixIndia) August 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations to Andhadhun on winning the National Award for Best Hindi film. We're not saying this because Radhika Apte is in it but yes Radhika Apte is in it.#NationalFilmAwards
— Netflix India (@NetflixIndia) August 9, 2019Congratulations to Andhadhun on winning the National Award for Best Hindi film. We're not saying this because Radhika Apte is in it but yes Radhika Apte is in it.#NationalFilmAwards
— Netflix India (@NetflixIndia) August 9, 2019
राधिकानं आतापर्यंत नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरीज', 'घोल' आणि 'सेक्रेड गेम्स'सारख्या प्रसिद्ध सीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ती लवकरच ‘रात अकेली हैं’ या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.