ETV Bharat / sitara

अनन्या पांडेच्या व्हाट्सअप चॅटमधील 'त्या दोन' स्टार किड्सच्या शोधात एनसीबी - अनन्या आणि आर्यनचे चॅट संशयास्पद

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता एक नवं वळण लागलं आहे. चौकशीदरम्यान एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. यासंदर्भात एनसीबीने काल आणखी एका ड्रग्ज पेडलर काल रात्री अटक केली. आता आणखी दोन स्टार किड्स एनसीबीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दोन' स्टार किड्सच्या शोधात एनसीबी
दोन' स्टार किड्सच्या शोधात एनसीबी
author img

By

Published : Oct 22, 2021, 3:11 PM IST

मुंबई - मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता एक नवं वळण लागलं आहे. चौकशीदरम्यान एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. यासंदर्भात एनसीबीने काल आणखी एका ड्रग्ज पेडलर काल रात्री अटक केली. आता आणखी दोन स्टार किड्स एनसीबीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आर्यन - अनन्याच्या चॅटनुसार, अनन्या पांडेनेच आर्यन खानला ड्रग्स पुरवले आहेत का? याचा तपास एनसीबी करत आहे. अद्याप एनसीबीकडे या चॅट व्यतिरिक्त ठोस असा पुरावा लागील. याचा तपास एनसीबी (NCB) करत आहे. या प्रकरणात अनन्या पांडेसह आणखी दोन स्टार किड्सचा समावेश असल्याचं देखील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ज्या चॅट्सची माहिती देत एनसीबीने अनन्या पांडेला चौकशी करता बोलावलं, त्यामधून अतिशय धक्कादायक खुलासा समोर आला आहे. चॅटमध्ये आर्यन खान आणि अनन्या पांडे गांजाबद्दल बोलताना दिसत आहेत. हे संभाषण या दोघांमध्येच झालं आहे. त्यामुळे आता अनन्या पांडेच्या संकटात वाढ होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आर्यन खान, अनन्या पांडेला विचारतोय गांजा मिळेल का? यावर अनन्याच उत्तर होतं ती व्यवस्था करेल. या चॅटमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. यामुळे अनन्या पांडे यामध्ये अडकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जेव्हा अनन्या पांडेला या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अनन्या म्हणाली, की ती आर्यन खानसोबत विनोद करत होती. NCB च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यतिरिक्त, त्यांच्या अशा अनेक गप्पा आहेत ज्यात दोघे वेगवेगळ्या प्रसंगी मादक पदार्थांबद्दल बोलत आहेत.

असे सांगितले जात आहे, की आर्यन-अनन्याच्या या गप्पांमध्ये नशेबद्दल संभाषण होते. या चॅटनंतर एनसीबी ऍक्शनमध्ये आले आहे. या प्रकरणातील चॅट सुनावणी दरम्यान न्यायालयाला देण्यात आली. गुरुवारी अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात पोहोचली. त्यावेळी तिच्यासोबत वडील चंकी पांडे होते.

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यन चा व्हाँट्सअप चॅट

आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हाती आर्यन खानचे काही चॅट्स लागले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडची एक नवखी अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅट्समध्ये अभिनेत्रीसोबत आर्यन खानची अमंली पदार्थांबाबत चर्चा झाली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान एनसीबीनं ज्या आरोपींचे चॅट्स सादर केले होते. त्यामध्ये आर्यन खानसह या अभिनेत्रीच्याही चॅट्सचा समावेश आहे.

कधी झाली अटक?

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अद्यापही तो आर्थर रोड जेलमध्येच असून 30 ऑक्टोबरपर्यंत त्याला कोठडी मिळाली आहे. दरम्यान आर्यनच्या सुटकेसाठी खान कुटुंबीय शर्थीची न्यायालयीन लढाई लढत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.