ETV Bharat / sitara

संगीतकार ए.आर. रहमानची मुलगी खतिजा रेहमानचा झाला साखरपुडा

संगीतकार ए.आर. रहमान यांची मुलगी खतिजा रेहमान हिने रविवारी रियासुद्दीन शेख मोहम्मदसोबत लग्न करीत असल्याची घोषणा केली आहे. खतिजाने इन्स्टाग्रामवर रियासुद्दीन शेखसोबतचा तिचा फोटो पोस्ट करून एंगेजमेंटची माहिती दिली.

author img

By

Published : Jan 3, 2022, 6:59 PM IST

खतिजा रेहमानचा झाला साखरपुडा
खतिजा रेहमानचा झाला साखरपुडा

मुंबई - ज्येष्ठ संगीतकार ए.आर. रहमान यांची मोठी मुलगी खतिजा रहमान हिने रविवारी रियासुद्दीन शेख मोहम्मदसोबत लग्न करीत असल्याची घोषणा केली आहे. खतिजा रहमान देखील संगीतकार आहे. तिने रियासुद्दीन शेखसोबतचे त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. रियासुद्दीन हा साऊंड इंजिनीअर आहे. 29 डिसेंबरला दोघांनी एंगेजमेंट केली होती.

खतिजा म्हणाल्या, 'अल्लाहच्या कृपेने, तुम्हाला हे कळवण्यास आनंद होत आहे की, माझी रियासुद्दीन शेख मोहम्मदसोबत एंगेजमेंट झाली आहे. एंगजमेंट २९ डिसेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पार पडली. यावेळी जवळचे कुटुंबीय आणि प्रियजन उपस्थित होते. धन्यवाद.'

गेल्या वर्षी खतिजाने क्रिती सेनन अभिनीत 'मिमी' चित्रपटातील 'रॉक ए बाय बेबी' या गाण्याला तिने आवाज दिला होता. या गाण्याला तिचे वडील ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे.

हेही वाचा - Ekta Kapoor Covid 19 Positive : एकता कपूरला कोरोनाची लागण, बॉलिवूड स्टार्सना कोरोनाचा विळखा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.