मुंबईः नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर 'मोतीचूर चकनाचूर'च्या निर्मात्यांनी गुरुवारी संध्याकाळी 'क्रेजी लगदी' गाणे रिलीज केले आहे. हे गाणेदेखील चित्रपटाच्या ट्रेलर इतकेच आकर्षक आहे.
या चित्रपटातील नायक पुष्पिंदर त्यागी ( नवाजुद्दीन सिद्दीकी ) आणि नायिका ऐनी( आतिया शेट्टी) यांच्यातील रोमँटिक प्रेमाची झलक यात पाहायला मिळते.
अथिया शेट्टीला विदेशात जायचं असतं. याच कारणासाठी ती नवाजुद्दीनसोबत लग्न करते. मात्र, लग्नानंतर तिला कळंत, की त्याला लग्नानंतरच नोकरी लागली आहे. तिला ही गोष्ट समजल्यानतंर काय काय प्रसंग घडतात, त्याची झलक या गाण्यामध्ये पाहायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी झळकणार आहे. या चित्रपटात दोघांच्याही लग्नाची हटके गोष्ट पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाचं पहिलं गाणंही शेअर करण्यात आलं आहे.
विदेशात जाण्यासाठी आतुर असलेली अथिया आणि लग्नासाठी उताविळ झालेल्या नवाजुद्दीनची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.