मुंबई - रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाच्यावतीने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. मीडियाच्या एका समुहाने नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे यात म्हटले आहे.
मानेशिंदे यांनी सांगितले, "सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित एम्सच्या डॉक्टरांनी काढलेले निवेदन मी पाहिले आहे. अधिकृत कागदपत्रे आणि अहवाल एम्स आणि सीबीआयकडे फक्त या क्षणी आहेत, चौकशीनंतर न्यायालयात सादर करण्यात येईल. सीबीआयच्या वतीने याबाबत काय सांगितले जाईल, याची प्रतीक्षा आहे.''
मानेशिंदे म्हणाले, ''रिया चक्रवर्तीच्या बाजूने आम्ही नेहमी सांगितलंय की, सत्य कोणत्याही परिस्थितीत बदलू शकत नाही. मीडियाच्या एका समुहाने लावलेले कयास खोडसाळ आणि त्रास देणारे होते. आम्ही सत्यासाठी कटिबद्ध आहोत. सत्यमेव जयते.''
एम्समधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिला आहे. अशा प्रकारे सुशांतच्या परिवाराने आणि वकिलाने केलेला, विष देण्यात आल्याचा आणि गळा घोटून मारल्याचा दावा फोल ठरला आहे.
या प्रकरणाचा अद्याप खटला सुरू असल्यामुळे एम्सच्या डॉक्टरांनी यावर काही भाष्य करण्यास नकार दिला आहे. सीबीआयने अजूनही यावर मौन बाळगले आहे.