मुंबई - अरबाज खानसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा सध्या आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती अनेकदा अर्जून कपूरसोबत स्पॉट केली जाते. मलायका अर्जूनपेक्षा वयानं भरपूर मोठी आहे, याबद्दलचं आता तिनं आपलं मत मांडलं आहे.
एखाद्या नात्यामध्ये तुमचं वय किती या गोष्टीचा काहीही फरक पडतं नाही. नात्यामध्ये दोन मनं आणि त्यांचे विचार जुळणं अधिक गरजेचं असल्याचं तिनं म्हटलं आहे. मात्र, आपण अशा समाजामध्ये राहतो, जिथे एखादा वयानं जास्त असलेला पुरूष आपल्याहून लहान आणि तरूण असलेल्या मुलीला डेट करू शकतो. मात्र, एक वय जास्त असलेली महिला एखाद्या तरूण मुलाला डेट करू शकत नाही, असं म्हणत मलायकानं वयावरून टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
यासोबतच अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मला पुन्हा प्रेम होईल की नाही याबद्दल खात्री नव्हती कारण पुन्हा एकदा हृदय तुटण्याची भीती होती. मात्र, मला पुन्हा एकदा प्रेमात पडायची इच्छा होती आणि अर्जूनसोबतच्या नात्यानं माझ्यातला आत्मविश्वास जागवत मला आणखी एक संधी दिल्याचे तिनं पुढं म्हटलं.