मुंबई - संजय लिला भन्साळींच्या चित्रपटांच्या प्रेमकथा सर्वसामान्यांना चित्रपटगृहाकडे खेचून घेणाऱ्या असतात. प्रेक्षकही भन्साळींच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात, आता त्यांचा 'मलाल' हा मराठमोळा टच असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यानंतर आता चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. एक मलाल हैं ऐसा, असं शीर्षक असलेलं हे गाणं चित्रपटाचं शीर्षक गीत आहे. नात्यामध्ये आलेल्या दुराव्यानंतर एकमेकांसोबत घालवलेल्या जुन्या क्षणांच्या आठवणीत बुडालेले मिझान आणि शर्मिल यांची झलक या गाण्यात पाहायला मिळते.
-
Title track of Malaal: https://t.co/qJO7BP6OI2
— Komal Nahta (@KomalNahta) July 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Title track of Malaal: https://t.co/qJO7BP6OI2
— Komal Nahta (@KomalNahta) July 1, 2019Title track of Malaal: https://t.co/qJO7BP6OI2
— Komal Nahta (@KomalNahta) July 1, 2019
चित्रपटातील आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्वच गाण्यांना मराठमोळा टच होता. मात्र, हे एक इमोशनल साँग आहे. या गाण्याला शैल हाडा यांनी आवाज दिला आहे. तर प्रशांत इंगोले यांचे बोल आहेत. हा चित्रपट येत्या ५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.