ETV Bharat / sitara

महेश भट्ट-रिया यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल, भट्ट यांना ट्रोलर्सनी झोडपले

8 जूनपासून महेश भट्ट आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांचे व्हॉट्सअॅपवरील संभाषणे ऑनलाइन लीक झाल्यानंतर चित्रपट निर्माते नेटिझन्सच्या रडारखाली आले. नेटिझन्सनी असा दावा केला आहे की त्यांच्यासारख्या माणसांचा सन्मान करणे योग्य नाही.

Mahesh Bhat
महेश भट्ट
author img

By

Published : Aug 21, 2020, 5:14 PM IST

मुंबई: शुक्रवारी चित्रपट निर्माते महेश भट्ट हे ट्विटरवर ट्रेंड झाले आहेत. ८ जून रोजी रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर सोडल्यानंतर ती व्हाट्सअपच्या माध्यमातून महेश भट्ट यांच्या संपर्कात होती. या संभाषणाचे स्क्रिन शॉट्स व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी महेश भट्ट यांना ट्रेल करायला सुरूवात केली. इतकेच नाही तर भट्ट हे सन्मानासाठी पात्र नसल्याचेही काहींनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या गप्पांचे स्क्रीन शॉट्सवरून असे दिसते की रियाने महेश भट्ट यांना 8 जून रोजी प्रियकर सुशांतसिंह राजपूतला सोडत असल्याची माहिती दिली होती.

भूतकाळात अभिनेत्री परवीन बाबीच्या मानसिक आरोग्याविषयी ज्याप्रमाणे बोलले, त्याप्रमाणेच महेश भट्ट यांनी अभिनेत्याच्या निधनानंतर सुशांतच्या नैराश्याविषयी बोलण्यास सुरुवात केली, असा नेटिझन्सचा आरोप आहे.

परवीन बाबी उदास होती!

दिव्या भारती उदास होती!

जिआ खान निराश होती!

सुशांतसिंग राजपूत निराश होता!

हे सर्व निराश झाले आणि म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली. एका महिलेने ट्वीट केले आहे की, ''# महेशभट्ट हा कट लपविण्यासाठी ते सर्व निराश आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर होते असा टॅग लावू नका''

"हा CR?ZY माणूस महेश भट्ट मनोरुग्ण आहे का? आणि मग जाऊन इतरांना उदास ठरवतो, cr?zy. परवीन बाबीला त्याने वेड्याचे लेबल लावले होते आणि नंतर त्याने हाच स्टंट सुशांतसोबत केला.'', असे एका युजरने म्हटले आहे.

# महेशभट्ट, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी आणि आदर करावा... पण महेश भट्ट सारख्या नागरिकांचे काय ?? तरुण पिढी त्याच्याबद्दल लज्जित आहे !! ”, असे दुसर्‍या युजरने ट्विट केले.

गुरुवारी सुशांतच्या पोस्टमार्टमच्या वेळी रिया चक्रवर्ती ही कूपर हॉस्पिटलमध्ये होती असा दावा करणारे वृत्त समोर आले होते. यासाठीही नेटिझन्स भट्ट यांनाच दोषी ठरवत आहेत.

"रिया चक्रवर्ती हिला रूग्णालयात आत जाण्यास कोणी परवानगी दिली? ती तिथे ४५ मिनिटांसाठी थांबली होती. या ४५ मिनिटात ती काय करीत होती? अर्थातच ती पुराव्यांत छेडछाड करीत होती... # मेहेशभट्ट # एरेस्ट रियाताई," असे एका युजरने ट्विट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.