ETV Bharat / sitara

दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारी ‘मॅडम चीफ मिनिस्टर’!

author img

By

Published : Jan 22, 2021, 7:16 AM IST

‘मॅडम चीफ मिनिस्टर‘ या चित्रपटाच्या नावावरूनच कल्पना येते की यात राजकीय नाट्य असणार, आणि आहेही, ज्यात वरील नमूद केल्याप्रमाणे ‘जेवणाचा’ प्रसंग आहे. किंबहुना चित्रपटातून वर्तमानपत्रे व टेलिव्हिजन वाहिन्यांवर येणाऱ्या ‘राजकीय’ घडामोडी दर्शविण्यात आल्या आहेत. त्यामुळे चित्रपटाला वास्तविकता मिळाली असून तो कुठेच कंटाळवाणा न होता बऱ्याच अंशी मनोरंजन करतो.

मॅडम चीफ मिनिस्टर’
मॅडम चीफ मिनिस्टर’

मुंबई - स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशात दलितांवर अन्याय होत आला आहे. नजीकच्या काळात चित्र थोडं बदललेलं वाटत असलं तरी बव्हंशी आंतरिक भागांमध्ये दलित व सवर्ण हा भेदभाव अजूनही केला जातो. त्यामुळेच राजकारणी, निवडणूक जवळ आल्या की, नेत्यांना खेडेगावांत दलितांच्या घरी जेवताना दाखवले जातात. विरोधी पक्ष याला नाटकी प्रकार म्हणतात व तेही तेच करताना दिसतात. ‘मॅडम चीफ मिनिस्टर‘ या चित्रपटाच्या नावावरूनच कल्पना येते की यात राजकीय नाट्य असणार, आणि आहेही, ज्यात वरील नमूद केल्याप्रमाणे ‘जेवणाचा’ प्रसंग आहे. किंबहुना चित्रपटातून वर्तमानपत्रे व टेलिव्हिजन वाहिन्यांवर येणाऱ्या ‘राजकीय’ घडामोडी दर्शविण्यात आल्या आहेत. त्यामुळे चित्रपटाला वास्तविकता मिळाली असून तो कुठेच कंटाळवाणा न होता बऱ्याच अंशी मनोरंजन करतो. दलित विरुद्ध सवर्ण हा या कथानकाचा गाभा असला तरी तो कुठेही झुकत नाही वा एकतर्फी होत नाही.
चित्रपटाची कथा
तारा रूपराम (रिचा चड्ढा) ही दलित घरात जन्मलेली सुशिक्षित मुलगी जी एका पुस्तकालयात नोकरी करत असते. युवा नेता इंद्रमणी त्रिपाठी (अक्षय ओबेरॉय) तिला नोकरी मिळवून देतो व ती त्याला शरीरसुख देतानाच त्याच्या प्रेमातही पडलेली असते. ती जेव्हा गरोदर राहते तेव्हा लग्नाचा विषय काढते परंतु जात पात, प्रतिष्ठामधे येते व इंद्रमणी तिला ‘प्रेमाची लाइफटाइम ऑफर’ देत धुत्कारून लावतो आणि तिच्यावर गर्भपात करवून घेण्यासाठी हल्ला करवतो. तारा चवताळून उठते व व्यक्तिगत आणि सामाजिक बदला घेण्याची शपथ घेते. तिला गुंडांपासून वाचवणाऱ्या परिवर्तन पार्टीचे जनक मास्तरजी (सौरभ शुक्ला) च्या चरणी येते व तिचा राजकीय प्रवास सुरु करते. तिचे जहरी वक्तव्य, बिनधास्त बोलणे व जिगरबाज स्वभावामुळे ती त्यांची लाडकी बनते. निवडणुकीमध्ये ती, जिथे कोणीही उभं राहायला तयार नसतं, वर्तमान मुख्यमंत्र्यांविरोधात उभी राहते व जिंकतेही, राजकारणी हातखंडे वापरून. मास्टरजी पार्टी नेत्यांच्या विरोधात जाऊन तिला मुख्यमंत्री बनवतात व तारा बनते ‘मॅडम चीफ मिनिस्टर’. पुढे ती कसा कारभार करते, विरोधी व युतीतील विकास पार्टी पक्षाचा विरोध कसा मोडून काढते व तिचे कोण कोण छुपे दुश्मन असतात याचा कसा छडा लावते वगैरेंनी चित्रपट व्यापला आहे. परंतु सर्व घटना, काही फिल्मी असूनही, गुंतवून ठेवतात.

‘मॅडम चीफ मिनिस्टर’ चं पात्र जरी काल्पनिक असले तरी यात देशाच्या राजकारणातील अनेक संदर्भ आढळतात. महाराष्ट्रातील युती सरकारमधील घडामोडींचीसुद्धा आठवण येते. पटकथा चांगली बांधली असून उगाचच गाणी न टाकल्यामुळे चित्रपट आशयापासून भरकटत नाही. बऱ्याच सीन्समध्ये सुभाष कपूर यांचे दिग्दर्शनीय कौशल्य प्रकर्षाने जाणवते. त्यांनी चित्रपटाचा वेग कायम ठेवला असून गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडी व पात्रांचे स्वभावविशेष यांचा नाट्यासाठी सुंदर उपयोग करून घेतला आहे. परंतु तारा या पात्राचा चढता आलेख विस्तृतपणे मांडला नसल्यामुळे भूमिकेला न्याय मिळत नाही. संगीत चांगले असून स्वानंद किरकिरेंनी गायलेलं ‘चिडी चिडी’ हे एकमेव गाणं जमून आलंय. दिग्दर्शकाने प्रकाशयोजनेचा वापर कल्पकतेने केला असून छायाचित्रकाराने उत्तम काम केले आहे. पूर्वाध उत्तरार्ध व वैयक्तिक राजकीय अशी चित्रपटाची विभागणी झाल्यासारखी वाटते. राजकारणात काहीही घडू शकतं हे माहित असल्यामुळे इथली ऍक्शन फिल्मी असूनही खटकत नाही.

चित्रपटाचे संवाद चांगले लिहिले गेले असून रिचा चड्ढाने भाषेचा लहेजा उत्तम पकडत काही ‘शिटी-मार’ डायलॉग्स ‘मारलेत’. यातील ‘मैं कुंवारी हूँ, तेज कटारी हूँ, मैं तुम्हारी हूँ’ या संवादाचा वापर खुबीने केला असून पुरुषी मानसिकतेवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलाय. तिला ‘हिरो’ न बनवता तिच्यातील राजकीय लालसेपोटी बदलत जाणारी स्त्री उभी करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलाय. रिचा चड्ढाने प्रमुख भूमिकेत जण ओतली आहे व तिच्यामुळे भूमिकेला धार चढल्यासारखी भासते. सौरभ शुक्लाने नेहमीप्रमाणे मस्त भूमिका रंगवलीय. मानव कौल (पती), अक्षय ओबेरॉय छान पण सुभ्राज्योती भारत (युती-पार्टी नेता) नकारात्मक भूमिकेत बराच भाव खाऊन जातो.

‘मॅडम चीफ मिनिस्टर’ लॉकडाऊन पश्चात चित्रपटगृहांत प्रदर्शित झालाय, परंतु कोरोना-पूर्व ‘नॉर्मल’ परिस्थितीमध्ये प्रदर्शित झाला असता तर बॉक्स ऑफिसचे आकडे अजूनही खूपच चांगले दिसले असते. येथे ‘मेकर्स’ चं अभिनंदन करावं लागेल कारण त्यांनी चित्रपटसृष्टीच्या भावी उज्वल वाटचालीसाठी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलाय.
हेही वाचा - कर्नाटकातील शिमोग्यात जिलेटीनने भरलेल्या ट्रकमध्ये भीषण स्फोट, आठ जण ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.