ETV Bharat / sitara

टाळेबंदीमध्ये जन्मलेली ‘प्रेम-लग्न’कथा 'लॉकडाऊन लग्न'! - दिग्दर्शक सुमीत संघमित्रा

लॉकडाऊनच्या काळात घडलेली एक भन्नाट प्रेमकथा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे. ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाचा कथेचा जन्मही याच कालखंडातलाच. ही प्रेम-लग्नकथा घेऊन येताहेत लेखक, दिग्दर्शक सुमीत संघमित्रा. या नव्या चित्रपटाचा शुभारंभ नुकताच पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी केला.

'Lockdown Lagna'
'लॉकडाऊन लग्न
author img

By

Published : Jan 12, 2021, 12:54 PM IST

मुंबई - २०२० प्रामुख्याने लॉकडाऊनने व्यापला होता. नवनवीन गोष्टी शिकतानाच फावल्या वेळात लेखकांना नवीन कल्पना सुचत होत्या व त्यात ‘लॉकडाऊन’ हा विषय नसला तर नवलच. ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाचा कथेचा जन्मही याच कालखंडातलाच. ही प्रेम-लग्नकथा घेऊन येताहेत लेखक, दिग्दर्शक सुमीत संघमित्रा. या नव्या चित्रपटाचा शुभारंभ नुकताच पुण्याच्या जागृत देवस्थानात म्हणजेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी केला.

निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक यांच्या ‘डॉक्टर डॉक्टर’ चित्रपटाच्या यशानंतर ते पुन्हा एकदा नव्या कोऱ्या आणि दमदार विषयाच्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. सह निर्माते आहेत हर्षवर्धन भरत गायकवाड तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित संघमित्रा करत असून चित्रपटात बऱ्याच दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे परंतु तूर्तास या चित्रपटातील कलाकार अजूनही गुलदस्त्यात आहेत.

या चित्रपटाची मजेदार कथा सुमीत संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे तर या चित्रपटाचे डिओपी योगेश कोळी आहेत. या शिवाय या लग्नकथेला खरा साज चढवलाय तो 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटातील गाण्यांनी. लॉकडाऊन मधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केला आहे.

‘लॉकडाऊन लग्न' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्याच्या तयारीस लागला आहे.

हेही वाचा - 'त्रिभंगा'त काम करणे अभिनयाच्या मास्टर क्लासहून वेगळे नाही - वैभव तत्ववादी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.