ETV Bharat / sitara

केरळ विमान दुर्घटना : बॉलिवूड स्टार्सनी दु:ख व्यक्त करीत वाहिली श्रद्धांजली - विमान अपघातात किमान 14 जणांचा मृत्यू झाला

अक्षय कुमार, अजय देवगण, रणदीप हूडा, ईशा गुप्ता, दिशा पटानी, संगीतकार सलीम मर्चंट यांच्यासह बॉलिवूड स्टार्सनी शुक्रवारी कोझिकोड विमान अपघाताबाबत शोक व्यक्त केला. या विमान अपघातात किमान 14 जणांचा मृत्यू झाला होता.

Kozhikode plane crash:
कोझीकोड विमान अपघात:
author img

By

Published : Aug 8, 2020, 12:33 PM IST

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार, प्रीती झिंटा, अजय देवगण, इशा गुप्ता, आणि श्रद्धा कपूर यांनी शुक्रवारी संध्याकाळी एअर इंडिया एक्सप्रेस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावरुन प्रार्थना व्यक्त करीत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

या घटनेबद्दल शोक व्यक्त करत अभिनेता अक्षय कुमारने ट्वीट केले की, "भयानक बातमी! # एअर इंडिया एक्सप्रेस विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो."

पायलटच्या निधनाबद्दल इशा गुप्ता यांनी दु: ख व्यक्त केले आणि ट्विट केले की, "कॅप्टन दीपक वसंत साठे सर यांचे कुटुंबीय व प्रियजन यांच्याबद्दल प्रार्थना आणि संवेदना. ते फक्त नियमित प्रशिक्षित पायलट नव्हते, त्यांनी आयएएफमध्ये प्रायोगिक चाचणी पायलट म्हणूनही काम केले होते. आरआयपी सर #AirIndiaExpress. "

प्रीती झिंटा यांनी प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आणि ट्विट केले की, "कोझीकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमान अपघाताविषयी ऐकून दुःख झाले. विमानातील प्रवाशांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी प्रार्थना. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांचे कुटुंब आणि मित्र यांच्यासाठी संवेदना.''

अजय देवगण यांनी ट्विटरवर लिहिले की, "सर्व प्रवासी आणि चालक दलातील सर्व सदस्यांबरोबर मी प्रार्थना करतो आणि ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मनःपूर्वक शोक व्यक्त करतो."

"कोझिकोड एअर क्रॅशबद्दल ऐकून खूप दुःख झाले. जखमी प्रवाशांसाठी प्रार्थना आणि आपल्या प्रियजनांचा मृत्यू झालेल्यांसाठी तीव्र संवेदना." असे श्रद्धा कपूरने ट्विटमध्ये म्हटले आहे.

रणदीप हूडाने ट्विटरवरुन घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले, "विमान अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला. सर्व प्रवाशांसाठी आणि कॅलिकट विमानतळावरील सर्व क्रू मेंबर्ससाठी प्रार्थना."

“कोझिकोडमधील धावपट्टीवर #Airndia विमानाच्या दुर्घटनाग्रस्त लँडिंगमुळे तीव्र धक्का बसला. सर्व प्रवासी, पायलट, चालक दल, जहाज आणि कॅलिकट विमानतळावरील क्रू यांच्यासाठी प्रार्थना. हे वर्ष भयानक वर्ष,” असे दिशा पटानी यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

सदर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करताना अभिनेता सनी देओल यांनी ट्विटरवर जाऊन लिहिले की, "केरल में # एअर इंडिया एक्सप्रेस विमान के दुर्घटानाग्रस्त होने से गहरा दुख हुआ. सभी यांत्रियें और चालक दल के सदस्यों के सुरक्षा के लिए प्रार्थना करता हूँ.''

चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी या दुखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला. संगीतकार सलीम मर्चंट यांनीही आपल्या भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या आहेत.

एअर इंडिया एक्स्प्रेस दुबई- कोझीकोड आयएक्स विमानाने वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून १९१ जणांना घेऊन कोझिकोडमधील करिपूर विमानतळावर धाव घेतली. कोझिकोडमधील करिपूर विमानतळावर दुबईहून आलेल्या विमानास अपघात झाल्याने १ ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १२० हून अधिक जखमी झाले, अशी माहिती मलप्पुरम पोलिस अधीक्षक (एसपी) यांनी शुक्रवारी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.