ETV Bharat / sitara

शाहिदच्या 'या' सवयीवर कियारा फिदा, शेअर केला व्हिडिओ - arjun reddy

कियाराने शाहिदचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहिदसमोर जेवणाचे डबे असून तो घरचं जेवणं जेवताना दिसत आहे.

शाहिदच्या 'या' सवयीवर कियारा फिदा
author img

By

Published : Jun 8, 2019, 5:01 PM IST

मुंबई - 'एम. एस. धोनी' चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच 'कबीर सिंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच यातील नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

अशात आता कियाराने शाहिदचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहिदसमोर जेवणाचे डबे असून तो घरचं जेवणं जेवताना दिसत आहे. कियाराने या व्हिडिओला कॅप्शन देत म्हटलं आहे, की माझ्यानंतर मला भेटलेला हा पहिला सहकलाकार ज्याला घरचं जेवण जेवायला आवडतं.

यामुळेचं शाहिद आपला आवडता सहकलाकार असल्याचं तिनं म्हटलं आहे. दरम्यान दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक असणारा 'कबीर सिंग' चित्रपट येत्या २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिदची एक वेगळी भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार असल्यानं प्रेक्षकही या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.