ETV Bharat / sitara

कॅटरिना दिल्लीत सलमान खानसोबत १५ दिवस करणार 'टायगर 3' चे शुटिंग

कॅटरिना कैफचा पती विकी कौशल लग्नाच्या एका आठवड्यानंतर कामावर परतला आहे. आता कॅटरिनाही दिल्लीत टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज झाली आहे. कॅटरिना दिल्लीत सलमान खानसोबत १५ दिवस शुटिंग करणार आहे.

टायगर 3 च्या शुटिंगमध्ये कॅटरिना भाग घेणार

author img

By

Published : Dec 18, 2021, 3:51 PM IST

मुंबई - कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला एक आठवडा झाला आहे. राजस्थानमध्ये ९ डिसेंबरला या जोडप्याचा शाही विवाह पार पडला होता. कॅटरिना कौशल कुटुंबाची पूर्ण काळजी घेत आहे. कॅटरिनाच्या सासरच्या मंडळींना सरप्राईज देण्याचा सोहळाही शुक्रवारी पार पडला. या दिवशी कॅटरिनाने रव्याची खीर बनवून सासरच्या मंडळींना खाऊ घातली. आता कॅटरिना कामावर परतण्याच्या तयारीत आहे. कॅटरिनाचा पती विकी कौशल शुक्रवारीच कामावर परतला आहे.

कॅटरिना कैफने लग्नासाठी सलमान खान स्टारर चित्रपट 'टायगर 3' च्या शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. तिने चित्रपटाचे पहिले दोन परदेशी शेड्युल पूर्ण केले आहे. मीडियानुसार, 'टायगर-3' चित्रपटाचे शूटिंग जानेवारीमध्ये दिल्लीत होणार आहे. कॅटरिनाने चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्ण तयारी सुरू केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना सलमान खानसोबत दिल्लीत जवळपास 15 दिवस शूटिंग करणार आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे आता चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा देखील वेगाने काम करण्याच्या मूडमध्ये आहेत. सलमान-कॅटरिना दिल्लीच्या खऱ्या लोकेशनवर जाऊनच शूटिंग करणार असल्याचं सांगण्यात येत आहे, याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.

निर्माते देखील दिल्लीच्या वास्तव लोकेशनवर शूट दरम्यान गर्दी लक्षात घेऊन तयारी करत आहेत. सलमान आणि नवविवाहित वधू कॅटरिनाला पाहणारी गर्दी अनियंत्रित होऊ नये, यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विकीनेही त्याचे काम सुरू केले आहे.

विकीने शनिवारी त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो कामावर जाण्याचा उल्लेख करत आहे. यासाठी त्याने इमोजीचा वापर केला.

लग्नानंतर विकी 'सॅम बहादुर', 'गोविंदा नाम मेरा' सारख्या चित्रपटात दिसणार आहे आणि कॅटरिना 'टायगर-3', 'फोन भूत' आणि 'जी ले जरा' या सारख्या चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा - SRK Plan For Aryan Future : आर्यनच्या करियरसाठी शाहरुख खानने बनवला परफेक्ट प्लॅन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.