मुंबई - बॉलिवूडचा 'सोनू' म्हणजेच कार्तिक आर्यन सध्या राजधानी दिल्लीत 'शेहजादा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. जेव्हापासून पुन्हा सुटिंग सुरू झाली आहेत तेव्हापासून कलाकार सोशल मीडियावर चाहत्यांसह चित्रपटाशी संबंधित अपडेट्स शेअर करत राहतात. आता कार्तिकने एक अतिशय मजेशीर गोष्ट शेअर केली आहे. कार्तिक दिल्लीत आहे आणि यावेळी राजधानीचे तापमान कमी होत आहे. कार्तिक दिल्लीच्या थंड वाऱ्यात थरथर कापत असून, त्याचा एक फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शनिवारी कार्तिक आर्यनने 'शेहजादा' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. दरम्यान, अभिनेत्याने एक सेल्फी घेतला आणि तो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या फोटोसोबत कार्तिक आर्यनने लिहिलंय, 'यार इथे खूप थंडी आहे.' या फोटोत कार्तिकने थंडीपासून वाचण्यासाठी चष्मा आणि इअरबँड घातला आहे. एकूणच, दिल्लीतील थंडीमुळे कार्तिक आर्यन चांगलाच थरथरत आहे.
शनिवारी दिल्लीचे सकाळचे तापमान 6 अंश होते. कार्तिकने इन्स्टास्टोरीवर सेटचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्याने लिहिले की, '9 अंश, दिल्लीच्या हिवाळ्यात धूर निघत आहे.' व्हिडिओमध्ये अभिनेता तोंडातून धूर काढताना दिसत आहे. आणखी एक व्हिडिओ शेअर करत कार्तिकने लिहिले - अॅक्शन टीमलाही थंडी जाणवते.
दिल्लीत एवढ्या कडाक्याच्या थंडीत कार्तिक आर्यन आणि संपूर्ण टीमची शूटिंग करतानाची अवस्था बिकट झाली आहे. 'शेहजादा' हा साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा तेलुगु चित्रपट 'अला वैकुंठापुरमुलो' चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट अभिनेता वरुण धवनचा मोठा भाऊ रोहित धवन दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे.
हेही वाचा - SRK Plan For Aryan Future : आर्यनच्या करियरसाठी शाहरुख खानने बनवला परफेक्ट प्लॅन