नवी दिल्ली - कार्तिक आर्यनला व्हर्च्युअल लॅक्मे फॅशन वीकच्या कॅमेर्याचा सामना करावा लागला. यामध्ये तो सेलिब्रिटी डिझाइनर मनीष मल्होत्रासाठी शो स्टॉपर बनला. मल्होत्राने मिझवान फाऊंडेशनसोबत आपल्या नवीन ब्राइडल कलेक्शन 'रूहानियत' याला कॉउचर फिल्मच्या माध्यमातून सादर केले आहे.
कार्तिक या शो दरम्यान बेस्ट डिझायनर क्रीम कलरची शेरवानी परिधान केलेला दिसला. त्यासोबत त्याने डिझायनर शालही मॅच केली होती.
लॉकडाऊननंतर सात महिन्यांनी त्याने पहिल्यांदा शूट केले होते. महिला कारागीरांना प्रोत्साहन देणाऱ्या मिजवान वेलफेयर सोसायटी याचे आयोजन झाल्याबद्दल कार्तिकने आनंद व्यक्त केलाय.
मनीष मल्होत्राच्या रोहनियात या शोने लॅक्मे फॅशन वीकची सुरूवात झाली.
यावेळी लॅक्मे फॅशन वीक व्हर्च्युअली आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी अभिनेता कार्तिक आर्यन हा मनीष मल्होत्रासाठी दोनदा चालला होता.