मुंबई - करिना कपूर आगामी 'अंग्रेजी मेडियम'मध्ये पोलिसाची भूमिका साकारणार आहे. 'हिंदी मेडियम' या गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये करिनाची महत्त्वाची भूमिका आहे. इराफान खानसह राधिका मदन यात व्यक्तीरेखा साकारत आहेत.
इरफान खान यामध्ये 'चंपक' ही व्यक्तीरेखा साकारत आहे. त्याचे मिठाईचे दुकान असते. दीपक डोब्रियाल इरफानच्या भावाची भूमिका करीत असून मनू ऋषी त्याच्या चुलत बहिणीची भूमिका करीत आहे. तिघेही मिठाईचे दुकान चालवीत असतात पण एकमेकांचे शत्रू असतात. उदयपूरमध्ये 'अंग्रेजी मेडियम'चे शूटींग सुरू झाले असून लंडनमध्येही शूटींग होणार आहे.
'अंग्रेजी मेडिम' शिवाय करिना करण जोहरच्या 'तख्त' या पिरियड ड्रामामध्ये काम करीत आहे. यात रणवीर सिंग, विकी कौशल, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.