ETV Bharat / sitara

करण जोहर होस्ट करणार Bigg Boss OTT, सलमानपेक्षा हटके असणार स्टाईल - बिग बॉस ओटीटी

'बिग बॉस' हा रियालिटी शो भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र, निर्माता करण जोहर आता ‘बिग बॉस’च्या वेगळ्या सेगमेंटचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ‘बिग बॉस’च्या बदललेल्या फॉरमॅटअंतर्गत हा शो टेलिव्हिजनवर प्रसारित होण्याआधी ‘वूट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरु होणार आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jul 25, 2021, 10:21 PM IST

मुंबई - 'बिग बॉस' हा रियालिटी शो भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. एका घरात एक-दीड डझन सेलिब्रिटीजना अक्षरशः कोंडून ठेऊन घडणाऱ्या गोष्टींवर हा शो आधारित आहे. जे सर्वात जास्त कॉंट्रोव्हर्शियल आहेत, त्यांना या शोचे हमखास आमंत्रण येते. गेल्या एक दशकापासून विकेंडला अभिनेता सलमान खान 'बाहेरून' हजेरी लावतो आणि आठवडाभराच्या घडामोडींचा आणि सदस्यांचा 'समाचार' घेतो. सलमानची हसविण्याची आणि 'काट्यावर घेण्याची' स्टाईल लोकांना आवडते. म्हणूनच इतकी वर्षे तो 'वीकेंड का वार'चे सूत्रसंचालन करीत आहे. परंतु यावर्षी या शोचा फॉरमॅट बदलला आहे. सलमानच्या जागी निर्माता करण जोहर बिग बॉसमधील स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे.

करण जोहर करणार बिग बॉसचे सूत्रसंचालन

गैरसमज नसावा. कारण, करण जोहर सलमान खानला रिप्लेस करत नाही. तर तो ‘बिग बॉस’च्या वेगळ्या सेगमेंटचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे ‘बिग बॉस’च्या बदललेल्या फॉरमॅटअंतर्गत हा शो टेलिव्हिजनवर प्रसारित होण्याआधी ‘वूट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरु होणार आहे. मुख्य शोच्या दीड महिना आधी हा शो वूटवर प्रसिध्द होणार आहे. नंतर तो टेलिव्हिजनवर सुरु होणार आहे. या सेगमेंटच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी करण जोहरवर टाकण्यात आली आहे. करणची स्पष्ट, वेगवान, चमकदार आणि गतिशील शैली बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांकडे प्रेक्षकांना बांधून ठेवायला मदत करेल. करणकडे एकाच वेळी असणारा गमतीशीर स्वभाव आणि सामंजसपणा हा गुण प्रेक्षकांना हसवेल आणि अंतर्मुख करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच बिग बॉसच्या घरामध्ये बंद असलेल्या स्पर्धकांसाठी बाहेरील जगासाठी करण बाहेरची खिडकी असेल.

ओटीटीनंतर दिसणार कलर्सवर

नुकत्याच जाहीर झालेल्या "बिग बॉस ओटीटी"च्या लाँचनंतर बिग बॉस शोच्या चाहत्यांना करमणूक, खळबळ आणि नाट्याची अतिरिक्त मेजवानी देण्यास सज्ज झाला आहे. भारतातील प्रथितयश दिग्दर्शक, निर्माता करण जोहर, ब्लॉकबस्टर होस्ट म्हणून बिग बॉस ओटीटीमध्ये सामील झाला आहे. वूटवर चालणाऱ्या सहा आठवड्यांच्या या शोसाठी करण जोहर बिग बॉसचे ओटीटीवर अँकरिंग करणार आहे. बिग बॉसच्या चाहत्यांना प्रथमच सर्व ड्रामा आणि अ‍ॅक्शन २४ तास घरातून थेट पाहायला मिळतील. याशिवाय बिग बॉसच्या चाहत्यांना वूटवर १ तासांचा भाग दाखवण्यात येईल. या व्यतिरिक्त दर्शकांना एक्सक्लुझिव्ह कट्स, २४ तास कंटेंट आणि संपूर्ण इंटरएॅक्टिव्ह आवृत्ती पाहण्याची संधी देखील मिळणार आहे. ‘डिजिटल एक्सक्लुझिव्ह’ पूर्ण झाल्यानंतर हा शो ‘बिग बॉस सीझन १५’ च्या लाँचिंगसह कलर्सवर अखंडपणे पुढे जाईल.

करण म्हणाला...

वूटवरील बिग बॉस होस्टच्या त्याच्या नव्या भूमिकेविषयी करण जोहर म्हणाला, की “मी आणि माझी आई बिग बॉसचे प्रचंड चाहते आहोत. एक दिवसही आम्ही शो चुकवत नाही. एक प्रेक्षक म्हणून हा नाटकिय ड्रामा माझे खूप मनोरंजन करतो. अनेक दशकांपासून मी बर्‍याच कार्यक्रमांचे होस्टिंग करण्याचा आनंद घेतला आहे. त्यात बिग बॉस ओटीटी नक्कीच अव्वल असेल. हे माझ्या आईचे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. बिग बॉस ओटीटी निःसंशयपणे जास्त खळबळजनक आणि नाट्यमय असेल. मला आशा आहे की मी प्रेक्षकांच्या आणि माझ्या मित्रांच्या अपेक्षेवर खरा उतरेन. तसेच माझ्या स्वत:च्या स्टाईलमध्ये स्पर्धकांसमवेत 'विकेंड का वार' मजेदार बनवून मनोरंजनाच्या पातळीचा स्थर अजून उंचावेन". दरम्यान, ८ ऑगस्ट २०२१ रोजी बिग बॉस ओटीटी प्रेक्षकांना स्पर्धकांच्या प्रवासात सामील करून घेईल.

हेही वाचा - "'हंगामा 2' बघू का तुझ्या नवऱ्याच्या बातम्या बघू'', शिल्पा शेट्टीला नेटकऱ्यांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.