मुंबई - 'कपिल शर्मा - आय एम नॉट डन यट' या नेटफ्लिक्स शोनंतर कपिल शर्माने त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कपिल सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अॅपलॉज एंटरटेनमेंट आणि नंदिता दास इनिशिएटिव्हजच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
या चित्रपटात कपिलने फूड डिलिव्हरी रायडरची भूमिका साकारणार आहे, तर शहाना गोस्वामी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस भुवनेश्वरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करीत ही माहिती कपिलच्या चाहत्यांना दिली आहे.
-
KAPIL SHARMA RETURNS TO ACTING: WILL STAR IN NANDITA DAS' NEXT DIRECTORIAL... #KapilSharma will star as a food delivery rider in actress - director #NanditaDas' next film... Not titled yet... #ShahanaGoswami will portray the role of his wife in the film. pic.twitter.com/bwqT9HlNlw
— taran adarsh (@taran_adarsh) February 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">KAPIL SHARMA RETURNS TO ACTING: WILL STAR IN NANDITA DAS' NEXT DIRECTORIAL... #KapilSharma will star as a food delivery rider in actress - director #NanditaDas' next film... Not titled yet... #ShahanaGoswami will portray the role of his wife in the film. pic.twitter.com/bwqT9HlNlw
— taran adarsh (@taran_adarsh) February 17, 2022KAPIL SHARMA RETURNS TO ACTING: WILL STAR IN NANDITA DAS' NEXT DIRECTORIAL... #KapilSharma will star as a food delivery rider in actress - director #NanditaDas' next film... Not titled yet... #ShahanaGoswami will portray the role of his wife in the film. pic.twitter.com/bwqT9HlNlw
— taran adarsh (@taran_adarsh) February 17, 2022
कपिल शर्मा टीव्ही जगतातील सुपरस्टार कॉमेडियन आहे. त्याची ख्याती देशविदेशातही आहे. आता सिनेमाकडे पुन्हा वळलाय तोही गंभीर भूमिका आणि दिग्दर्शन करणाऱ्या नंदिता दास यांच्यासोबत. दोघांची केमेस्ट्री कशी जुळते हे येणार काळ ठरवेल.
यापूर्वीही कपिल शर्माने तीन चित्रपटात काम केले आहे. भावनाओं को समझो, किस किसको प्यार करूँ आणि फिरंगी हे तीन चित्रपट आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी कमाल केलेली नाही. त्याची ही खंत नंदिता दास दूर करु शकतात. कारण त्याच्या वाट्याला फूड डिलिव्हरी रायडरची भूमिका आली आहे. ही एक प्रासंगिक कॉमेडी असू शकते, मात्र नंदिता दास यांचा विचार करता त्या आशयपूर्ण कथा निवडण्यासाठी ओळखल्या जातात. त्यामुळे कपिलसाठी हा चांगला संकेत मानायला हरकत नाही.
हेही वाचा - जान्हवीने शेअर केला ग्लॅमरस फोटो, खुशीने दिला 'घर सोडण्या'चा सल्ला