ETV Bharat / sitara

कपिल शर्मा बायोपिक 'फनकार'मधून उलगडणार कॉमेडी किंगची अनटोल्ड स्टोरी - कपिल शर्मा बायोपिक फनकार'

कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. फुक्रे चित्रपटाचे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा हे कॉमेडी किंग कपिल शर्माच्या बायोपिकवर काम करणार आहेत. चित्रपटाचे शीर्षकही निश्चित झाले आहे.

कपिल शर्मा
कपिल शर्मा
author img

By

Published : Jan 14, 2022, 6:10 PM IST

मुंबई - टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कपिल शर्माला आणखी जवळून जाणून घेण्याची संधी आता चाहत्यांना मिळणार आहे. खरंतर कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. फुक्रे चित्रपटाचे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा हे कॉमेडी किंग कपिल शर्माच्या बायोपिकवर काम करणार आहेत. चित्रपटाचे शीर्षकही ठरले आहे.

चित्रपट निर्माते महावीर जैन यांनी शुक्रवारी कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा केली. कपिलच्या बायोपिकचे नाव 'फनकार' असे निश्चित करण्यात आले आहे. लायका प्रॉडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे.

चित्रपट दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा म्हणाले, 'देशातील सर्वात मोठा फनकार कपिल शर्माची कथा प्रेक्षकांसमोर आणण्यास उत्सुक आहोत.

कपिल शर्मा लवकरच नेटफ्लिक्सवर त्याच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी सांगण्यासाठी येणार आहे. कपिलने या कार्यक्रमाचा टीझरही शेअर केला आहे. कपिलच्या प्रोजेक्टचे नाव आहे, 'आय एम नॉट डन येट'' ( I am not done yet )

हेही वाचा - चित्रपटांसाठी अर्पिता खानशी लग्न केल्याच्या आरोपावर आयुष शर्माने केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.