ETV Bharat / sitara

विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी कंगना रानौतने पोस्ट केला घोडेस्वारीचा व्हिडीओ! - कंगना रानौत इंस्टाग्राम

कंगनाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर ती खऱ्याखुऱ्या घोड्यावरून रपेट करतानाच व्हिडीओ पोस्ट केला. कदाचित तिला यातून तिच्या विरोधकांना हेच दाखवून द्यायचे असेल की ‘बघा, मी घोडेस्वारी करू शकते, आणि तीही सराईतपणे.’

kangana ranaut  shared horse riding video

author img

By

Published : Jun 14, 2021, 7:13 AM IST

मुंबई - सुशांत सिंग राजपूतच्या अकाली आणि संशयास्पद निधनानंतर काही महिन्यांपूर्वी कंगना रानौतच्या ट्विट-अटॅकने भल्याभल्यांची झोप उडविली होती. तिला अनेकांचा पाठिंबा मिळत होता पण काही तिच्या विरोधातही बोलत होते. कंगनाने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच त्यात झांसीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका वठविली होती. त्यात तिचे बरेच घोडेस्वारीचे प्रसंग होते परंतु एक व्हिडीओ पसरविला गेला ज्यात तो एका लाकडी घोड्यावर बसून शूट करतेय. खरंतर कंगना रानौत घोडेस्वारी शिकलीय आणि कदाचित काही तांत्रिक अडचणींमुळे लाकडी घोड्यावरून शॉट दिला असेल. असो. हे सांगण्याचे प्रयोजन हे आहे की कंगनाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर ती खऱ्याखुऱ्या घोड्यावरून रपेट करतानाच व्हिडीओ पोस्ट केला. कदाचित तिला यातून तिच्या विरोधकांना हेच दाखवून द्यायचे असेल की ‘बघा, मी घोडेस्वारी करू शकते, आणि तीही सराईतपणे.’

इंस्टाग्रामवर कंगना रनौतने घोड्यावर स्वार झाल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ब्लॅक पँटसह ती ऑरेंज पोलो शर्ट घालून रपेट करताना दिसतेय. तिने त्या क्लिपला टायटल दिले, ‘आज सकाळी घोडेस्वारी करताना’. तिचे घोडेस्वारीचे कसब पाहून अनेकांनी स्तुतीसुमने उधळली आहेत. कंगनाच्या घोडेस्वारीचे कौशल्य पाहून नेटिझन्स खूप प्रभावित झाले. “खूप छान ... तू त्यात छान दिसतेयेस,” "वाह ... छान," व. लिहिले गेले आहे. काही वर्षांपूर्वी कंगना घोडेस्वारी शिकली होती. खरं तर, ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’, या चित्रपटात तिने स्वत: चे स्टंट स्वतःच केले होते ज्यामध्ये घोडेस्वारीचादेखील समावेश होता.

कंगना तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी जाणली जाते आणि कदाचित त्यामुळेच एका समाज माध्यमाने तिचे एक सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहे. कंगना रानौत अभिनित, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांचा बायोपिक चित्रपट ‘थलायवी’ तयार असून कोविड-१९ च्या आक्रमणामुळे इतर अनेक चित्रपटांप्रमाणे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. याव्यतिरिक्त ती ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपट काम करीत असून तिच्या ‘मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजंड ऑफ दिड्डा‘ या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन स्टेजमध्ये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.