ETV Bharat / sitara

कंगना रणौतने शेअर केली 'धाकड'च्या अ‍ॅक्शन एक्सरसाइजची झलक - कंगना रणौतचा आगामी सिनेमा धाकड

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने आगामी धाकड या चित्रपटासाठी तिच्या अ‍ॅक्शन एक्सरसाइजची झलक शेअर केली आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत
author img

By

Published : Jul 26, 2021, 9:51 PM IST

कंगनाने इन्स्टाग्रामवर ही क्लिप शेअर केली आहे. यात ती धाकड चित्रपटासाठी फाईट मूव्हजचा सराव करताना दिसत आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन अॅक्शन सरावाची ही झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

या व्हिडिओत कंगना काळ्या रंगाच्या लाइक्रा पॅन्ट आणि टी-शर्टमध्ये हातामध्ये रॉड घेताना दिसत आहे. यात ती दोन पुरुषांसोबत अॅक्शन सीक्वेन्सचा सराव करताना दिसते.

कंगनाने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "लढाऊ नं 1, बाघी मुलगी #धाकड रिहर्सल"

कंगना रणौत आगामी चित्रपटात एजंट अग्निच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग मध्य प्रदेशात करण्यात आले. अभिनेता अर्जुन रामपाल या चित्रपटात कलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसापूर्वी कंगनाने तेजस चित्रपटाच्या अॅक्शनचा सराव करीत असतानाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टावर शेअर केला होता.

धाकड व्यतिरिक्त, कंगनाच्या हाती थलायवी आणि तेजस सारखे चित्रपट आहेत. थलायवी चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असून कोरोनाच्या सावटामुळे याचे रिलीज थांबले आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित 'इमर्जन्सी' चित्रपटात कंगना दुसऱ्यांदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी मणिकर्णिका या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केले होते.

हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचे निधन, मराठीसह या ५ भाषांमधील ५०० चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.