मुंबई - अभिनेत्री काजल अग्रवाल काल विवाहबंधनात अडकली. मुंबईमध्ये एका खासगी सोहळ्यात उद्योगपती गौतम किचलू आणि काजलचा विवाह झाला. काजलने हिंदी, तमीळ आणि तेलुगू चित्रपटात काम केले असून संपूर्ण देशभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विवाह सोहळ्याच्या अगोदर काजलने ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये ती लग्नासाठी तयार होताना दिसत आहे व बाजूला दागिने आणि लग्नाचा पोषाख आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
गुरुवारी तिने हळदी समारंभातील फोटो पोस्ट केले होते. ऑगस्ट महिन्यात गौतम आणि काजलचा साखरपुडा झाला होता. गौतमची इंटेरियर डिझायनिंगचा आणि सॉफ्टवेअर निर्मितीचा व्यवसाय आहे. कोरोना महामारीमुळे दोघांनी साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला. या सोहळ्याला जवळचे मित्र आणि कुटुंबिय उपस्थित होते.
काजल अग्रवाल सिंघम, मगधिरा, स्पेशल २६, थुप्पक्की या चित्रपटांसाठी ओळखली जाते. आगामी काळात ती कमल हासनसोबत 'इंडियन २' या चित्रपटात झळकणार आहे.