ETV Bharat / sitara

'जट लुधियाने दा'! 'स्टुडंट ऑफ द ईअर २'मधील नवं गाणं प्रदर्शित

हे गाणं पाहता चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार असल्याचे जाणवत आहे. दरम्यान या चित्रपटातून अभिनेत्री अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत

'स्टुडंट ऑफ द ईअर २'मधील नवं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : May 8, 2019, 11:23 AM IST

मुंबई - पुनित मल्होत्राद्वारा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द ईअर २' मधील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. जट लुधियाने दा असं या गाण्याचं शीर्षक आहे. गाण्यात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांची खास लव्हस्टोरी आणि डान्सची झलक पाहायला मिळत आहे.

या गाण्याचा बहुतेक भाग टायगर आणि तारावर चित्रीत केला गेला आहे. तर अनन्याची काही वेळाचीच झलक यात पाहायला मिळते. विशाल ददलानी आणि पायल देव यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर अनविता दत्त आणि रैप पोर्शन पैरी यांनी हे गाणं लिहिलं आहे.

हे गाणं पाहता चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार असल्याचे जाणवत आहे. दरम्यान या चित्रपटातून अभिनेत्री अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे, त्यांच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या १० मे ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.