मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतंच एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत बूकच्या हिंदी एडिशनचं हे प्रकाशन होतं, ज्यात जान्हवी अतिशय ग्लॅमर दिसत होती. मात्र, लूकसाठी तिचं कौतुक न होता जान्हवीला नेटकऱ्यांच्या टीकांचा सामना करावा लागत आहे.
कारण आहे, हातात उलटं पकडलेलं पुस्तक. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जान्हवीनं हे पुस्तक उलटं पकडलं असून तिची ही चूक नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. यानंतर काहींनी तिला नादान लडकी असं म्हटलं आहे, तर काहींनी उपहासात्मक किती हुशार, असं म्हणत या गोष्टीसाठी तिची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान या पुस्तकात एका सहमत नावाच्या काश्मीरी तरुणीची कथा पाहायला मिळणार आहे, जी भारतीय लष्कराला गुप्त माहिती पुरवण्याचे काम करते. हीच कथा मेघना गुलजार यांच्या राझी सिनेमात पाहायला मिळाली होती. यात आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका होत्या.
