ETV Bharat / sitara

पाहा, श्वास रोखायला लावणारा 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' चित्रपटाचा ट्रेलर

author img

By

Published : Aug 1, 2020, 5:05 PM IST

बहुप्रतिक्षित गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये गुंजन सक्सेनाचे पायलट बनून भारतीय वायुसेनात (आयएएफ) अधिकार बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय. जान्हवी कपूरने अत्यंत अभिमानाने हा ट्रेलर आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

Gunjan Saxena: The Kargil Girl trailer
'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल

मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूरच्या बहुप्रतिक्षित गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित झाला आहे.

या ट्रेलरमध्ये गुंजन सक्सेनाचे पायलट बनून भारतीय वायुसेनात (आयएएफ) अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय. वडिलांना अभिमान वाटावा यासाठी सशस्त्र दलात साहसी कृत्य करणाऱ्या लढवय्या मुलीचे ही कथा आहे.

जान्हवी कपूरने अत्यंत अभिमानाने हा ट्रेलर आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

दोन मिनिटे एकोणतीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलीच्या गोष्टीने सुरूवात होते. गुंजना जिद्दीने वायू सेनेत भरती होते. परंतु हे क्षेत्र महिलांसाठी नसल्याचे तिला सतत ऐकावे लागते. जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये कारगिल युध्द सुरू होते तेव्हा अवघड अशी रेस्क्यू मोहिमेत ती भाग घेते. शत्रू सैनिकांच्या हल्ल्याला चुकवत ती ही मोहिमे कशी गाजवते याचे श्वास रोखायला लावणारे चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात ५ ऑगस्टला होणार सुनावणी

पंकज त्रिपाठी यांनी गुंजन सक्सेनाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. आपल्या सहज अभिनयाने त्यांनी एक अनोखी छाप सोडली आहे. शरण शर्मा दिग्दर्शित, गुंजन सक्सेना: कारगिल गर्लमध्ये पंकज त्रिपाठी, विनीतकुमार सिंग, अंगद बेदी आणि मानव विज यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

आगामी बायोपिक धर्मा प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज निर्मित आहेत आणि 12 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.