ETV Bharat / sitara

‘बच्चन पांडे’ ला भेटायला जॅकलिन निघाली जैसलमेरला! - ‘बच्चन पांडे’मध्ये जॅकलिन फर्नांडिस

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ‘किक २’, ‘सर्कस’, ‘भूत पोलीस’ आणि ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांतून काम करीत आहे. अत्यंत व्यग्र टाईम शेड्यूल असलेली जॅकलिन पुढील आठवड्यात ती फिल्म ‘बच्चन पांडे’च्या टीममध्ये सामील होईल. बच्चन पांडेचे शुटिंग सध्या जैसलमेरमध्ये सुरू आहे.

Jacqueline Fernandes
जॅकलिन फर्नांडिस
author img

By

Published : Feb 12, 2021, 1:04 PM IST

मुंबई - अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे हे वर्ष खूप व्यस्ततेत जाणार आहे. ती यावर्षी तब्बल चार चित्रपट करत आहे. ‘किक २’, ‘सर्कस’, ‘भूत पोलीस’ आणि ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांतून ती दिसेल. सध्या ‘भूत पोलीस’चे शूट सुरु असून पुढील आठवड्यात जॅकलिन ‘बच्चन पांडे’ ला भेटायला जैसलमेरला रवाना होणार आहे.

हा चित्रपट साजिद नाडियाडवाला प्रॉडक्शन्स निर्मित असून त्यात अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि कृती सॅनन यांच्यासह जॅकलिन फर्नांडिस प्रमुख भूमिकांत आहे. हे सर्व मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जैसलमेरमध्ये डेरा टाकून असणार आहे. त्यानंतर बच्चन पांडेचे शूटिंग पुन्हा मुंबईत सुरू होईल.

Jacqueline Fernandes
जॅकलिन फर्नांडिस
निर्मात्यांच्या सूत्रांनुसार असे कळते की, "जॅकलिन पुढच्या आठवड्याच्या मध्यापर्यंत जैसलमेरला रवाना होईल आणि पुढच्या आठवड्यात शूटिंगसाठी बच्चन पांडे यांच्या टीममध्ये सामील होईल. अक्षय आणि इतरांसोबत ती या चित्रपटाचे काही महत्त्वाचे दृश्य चित्रित करणार आहे. हे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शूटिंग करतील व चित्रीकरण संपवतील.” इतर कलाकारांनी चित्रपटाचे विस्तृत शूटिंग या वर्षीच्या सुरूवातीलाच सुरु केले होते. जॅकलिन एकाधिक प्रोजेक्टसाठी बॅक-टू- बॅक शूटिंग करीत आहे आणि पुढील आठवड्यात ती फिल्म ‘बच्चन पांडे’च्या टीममध्ये सामील होईल.
Jacqueline Fernandes
जॅकलिन फर्नांडिस
या चित्रपटात अक्षय एका गँगस्टरची भूमिका साकारतोय ज्याला फिल्मस्टार बनण्याचा किडा असतो. अर्शद वारसी अक्षयच्या हरहुन्नरी मित्राच्या भूमिकेत आहे. क्रिती सेनॉन एका महत्वाकांक्षी फिल्ममेकरच्या भूमिकेत दिसेल परंतु जॅकलिनच्या भूमिकेबद्दल अजून तरी गुप्तता बाळगली गेली आहे. भूत पोलिस, किक २ आणि आता बच्चन पांडे चे शूट, जॅकलिन सतत शूट मोडमध्ये आहे आणि एका सेटवरून दुसर्‍या सेटवर जाणे तिचा नित्यक्रम झाल्यासारखे वाटत आहे.

हेही वाचा - मनी लाँडरिंग प्रकरणी राज कपूर यांचा नातू अरमान जैनला ईडीकडून समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.