ETV Bharat / sitara

कार्तिक आर्यनने अवघ्या १० दिवसात पूर्ण केले 'धमाका'चे शुटिंग - धमाका शुटिंग पूर्ण

२० दिवसांच्या शेड्यूलमध्ये संपूर्ण सिनेमा स्टार्ट टू फिनिश शुट करण्याचा संकल्प धमाका चित्रपटाच्या टीमने केला होता. दरम्यान अभिनेता कर्तिक आर्यनने त्याचे शुटिंग १० दिवसातच पूर्ण केले आहे. कॉमिक आणि रोमँटिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या कार्तिक आर्यनचा हा पहिलाचा थ्रिलर चित्रपट आहे.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन
author img

By

Published : Dec 25, 2020, 3:36 PM IST

मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यनची भूमिका असलेल्या 'धमाका' चित्रपटाच्या टीमने १४ डिसेंबर रोजी पवईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुटिंगला सुरूवात केली होती. कार्तिकने आपले शुटिंग १० दिवसातच पूर्ण केले असून कोरोनामुळे चिंतीत असलेल्या आपल्या आईच्या भेटीसाठी घरी परत येणार आहे.

एका आघाडीच्या वेबलॉईडने दिलेल्या अहवालानुसार अभिनेता कार्तिकने आपला आगामी 'धमाका' चित्रपट दहा दिवसात संपवला असून एक नवीन उदाहरण घालूनदिले आहे. ३०० लोकांचे युनिट हॉटेलमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करीत हॉटेलमध्ये सुरक्षित शूटिंग करीत होते.

रोमँटिक कॉमेडीजसाठी ओळखला जाणारा कार्तिक धमाका चित्रपटात एक पत्रकार म्हणून काम करताना दिसणार आहे. 'धमाका' चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि माधवानी यांच्यासह सह-निर्माता अमिता माधवानी यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट सेट करण्यात आला आहे.

हेही वाचा - नवीन कोविडचा तणाव : यूकेमध्ये अडकली प्रियंका चोप्रा, 'टेक्स्ट फॉर यू'चे शूटिंग थांबले

'धमाका' चित्रपटा व्यतिरिक्त कार्तिक आर्यन आगामी काळात 'दोस्ताना 2' आणि 'भूल भुलैया 2' मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा - 'ख्रिसमस मुड'मध्ये बॉलिवूड, बीग बी, करिनापासून प्रियांकापर्यंत सेलेब्सच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.