ETV Bharat / sitara

इरफान खानच्या चेहऱ्यावर हसू, 'अंग्रेजी मीडियम'चा फर्स्ट लूक प्रसिध्द

author img

By

Published : Jan 7, 2020, 5:31 PM IST

इरफान खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाच्या टीमने त्यांचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला आहे. यात करिना कपूर आणि राधिका मदन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Irfan Khan
इरफान खान

मुंबई - इरफान खानच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बहुप्रतीक्षित 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटातील इरफान यांचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला आहे.

मडॉक फिल्मने इरफान खान यांचा लूक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबत इराफनला वाढदिवसाच्या शुभेच्छाही कॅप्शनमध्ये दिल्या आहेत. बर्थडेची भेट म्हणून २०२० मध्ये 'अंग्रेजी मीडियम' इरफानला भेट म्हणून देत असल्याचा उल्लेखही करण्यात आलाय.

या फर्स्ट लूकमध्ये इरफान खान अत्यंत हसमुख दिसत आहेत. बराच काळ दुर्धर आजाराशी झुंजल्यानंतर इरफान काही महिन्यापूर्वी भारतात परतले होते. 'अंग्रेजी मीडियम' हा त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. त्यांचे चाहते रुपेरी पडद्यावर त्यांन पाहायला उत्सुक आहेत.

करिना कपूर या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारत आहे. तर राधिका इरफान यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया यांची महत्त्वाची भूमिका आहे.

'हिंदी मीडियम' या २०२७ मध्ये आलेल्या चित्रपटाचा 'अंग्रेजी मीडियम' सीक्वल आहे. दिनेश विजान यांची ही निर्मिती आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.