ETV Bharat / sitara

‘मनमर्जियां’ करणाऱ्या अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूला ‘आय-टी’ ची ‘थप्पड’!

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ऑफिसर्सनी तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, मधू मन्टेना यांच्या घरी आणि ऑफिसेस वर धाडी टाकल्या आणि सिनेविश्वात एकाच खळबळ उडाली. इतकंच नव्हे तर राजकीय वर्तुळातही याच्या प्रतिक्रिया उमटल्या. केंद्र सरकारसोबत मतांतर असल्यामुळे हे घडते आहे अशी चर्चा सुरु झाली.

Income Tax Department raids
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू
author img

By

Published : Mar 4, 2021, 6:09 PM IST

मुंबई - फिल्मी कलाकार आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे नाते खूप जुने आहे. पूर्वी किशोर कुमार, माला सिन्हा यांच्या घरी तर काही वर्षांपूर्वी प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ, अतुल कसबेकर आदींच्या घरी ‘आय-टी’ चे कर्मचारी सकाळी सकाळी पोहोचले होते. काल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ऑफिसर्सनी तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, मधू मन्टेना यांच्या घरी आणि ऑफिसेस वर धाडी टाकल्या आणि सिनेविश्वात एकाच खळबळ उडाली. इतकंच नव्हे तर राजकीय वर्तुळातही याच्या प्रतिक्रिया उमटल्या. केंद्र सरकारसोबत मतांतर असल्यामुळे हे घडते आहे अशी चर्चा सुरु झाली.

धाडीआधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नेहमीच पूर्वतयारी करीत असते व बऱ्याच गोष्टींचा शहानिशा केल्यानंतरच रेड टाकली जाते. इन्कम टॅक्सने मुंबई-पुण्यातील तब्बल ३० ठिकाणी छापे टाकून तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, मधू मन्टेना यांच्या ऑफिसेस व घरातील दस्तावेज छाननीसाठी गोळा केले आहेत. ‘फँटम’ निर्मितीसंस्था, जी काही वर्षांपूर्वी विसर्जित करण्यात आली होती. ज्यात अनुराग कश्यप, विकास बहल, मधू मन्टेना आणि विक्रमादित्य मोटवाने पार्टनर्स होते, आणि त्यातील आर्थिक व्यवहारांत त्रुटी सापडल्यामुळे व आयकर चोरीचा संशय बळावल्यामुळे ही धाड टाकण्यात आली. तसेच तापसीचे इन्कम व टॅक्स यांच्या ताळ्यातील घोळामुळे तिला या चौकशीला सामोरे जावे लागतेय.

जेव्हा आयकर धाड पडली तेव्हा अनुराग कश्यप व तापसी पन्नू त्यांच्या आगामी ‘दोबारा’च्या शूटिंगसाठी पुण्यात होते. ते अजूनही पुण्यातच आहेत व ते राहत असलेल्या ‘वेस्टीन’ हॉटेलातच त्यांची चौकशी दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. सूत्रांकडून असे कळतेय की दोघानींही आर्थिक व्यवहारासंबंधी त्यांच्या सीएला माहित असल्याचे सांगितले असले तरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ऑफिसर्सनी त्यांची चौकशी सुरुच ठेवली आहे. परंतु ‘आय-टी’ च्या वतीने कुठलीही माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. असंही कळतंय की ‘दोबारा’ चे मुख्य युनिट देखील ‘वेस्टीन’ मधेच वास्तव्यास होते व त्यातील बरेच जण मुंबईला परतले आहेत.

या अकस्मात पडलेल्या आयकर धाडीमुळे अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि तापसी पन्नू अभिनित ‘दोबारा’ चे शूट पुन्हा कधी सुरु होईल हे सांगता यायचे नाहीये. ‘मनमर्जियां’ करणाऱ्या अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूला ‘आय-टी’ ची ही ‘थप्पड’ किती महागात पडते हे काळच सांगू शकेल.

हेही वाचा - नेहमीच मोदी सरकारविरोधात भूमिका घेत आलेत अनुराग आणि तापसी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.