ETV Bharat / sitara

स्वतःला आव्हान देणे आवश्यक मानतो - विद्युत जामवाल - विद्युत जामवालचे स्वत:ला आव्हान

अॅक्शन हीरो म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीस आलेल्या विद्युत जामवालने स्वतःला आव्हान देणे, आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून त्याने स्वतःला कोणत्या प्रकारचे आव्हाने देत आहे, हे दाखवून दिलंय.

Vidyut Jamwal
विद्युत जामवाल
author img

By

Published : Nov 4, 2020, 4:43 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल स्वत:ला सतत आव्हान देणे आवश्यक मानतो. त्याने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो बिअर बॉटल पुश अप, चक्रासन, कित्येक मेणबत्त्या विझवणे, चालत्या एस्केलेटरवर पुशअप घेणे असे चमत्कार करताना तो दिसतो.

अभिनेता विद्युत जामवाल म्हणाला, "मी स्वत:ला सतत आव्हान देणे आवश्यक मानतो. ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की, माझ्या प्रशिक्षणाच्या पद्धतीमुळे बरेच लोक प्रेरित आहेत, परंतु मी जे काम करतो त्यापासून सर्वांनी शिकावे, अशी माझी इच्छा आहे. स्वत:ला आव्हान देत पाहा, मग तुम्ही जगण्यासाठी काय करता, हे महत्त्वाचे ठरत नाही."

विद्युत जामलावचा 'खुदाहाफीज' हा चित्रपट अलिकडेच रिलीज झाला होता. आता त्याचा सिक्वेलही येणार आहे. त्याचा आगामी कमांडो ३ हा चित्रपट प्रतीक्षेत आहे. 'कमांडो ३' चित्रपटात विद्युत जामवाल, अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन देवायह यांच्या भूमिका आहेत. आदित्य दत्त यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.