मुंबई - अभिनेत्री फ्लोरा सैनी अलीकडेच 'दरबान' या वेब फिल्ममध्ये दिसली होती. यात तिने एका श्रीमंत कौटुंबिक गृहिणीची भूमिका साकारली होती तिच्या जुन्या प्रतिमेहून ती यात वेगळी दिसली होती. याबद्दल तिने सांगितले की ती पडद्यावर कामुक दिसण्याला ती कंटाळली आहे आणि तिला स्वतःमधील प्रतिभा सिध्द करायची आहे.
फ्लोराने सांगितले की, "ही नेहमीच पटकथेची मागणी असते, त्यानुसार कलाकारांची निवड केली जाते. मी केलेल्या कामाचा मला अभिमान आहे, परंतु मी निर्माण केलेल्या प्रतिमेचे खंडन करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मी बर्याच ऑफरला नाही म्हणाले आहे, कारण त्यांच्यापैकी बहुतेकांना अभिनेत्री स्क्रिनवर मादक दिसावी असे वाटत होते. म्हणून ते मला भूमिका ऑफर करीत होते. मी स्त्री नावाचा एक चित्रपटही केलाय त्यात मी चेटकिणीची भूमिका केली होती.
फ्लोराची प्रतिमा हॉट गर्लची
'गंदी बात', 'एक्सएक्सएक्स', आणि 'दूपुर ठाकुर्पो' सारख्या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री फ्लोराची प्रतिमा हॉट दाखवण्यात आली होती.
पडद्यावर कामुक दिसण्याचा कंटाळा येतो!
ती पुढे म्हणाली, "जेव्हा लोक मला सेक्सी म्हणतात, तेव्हा मी ती प्रशंसा म्हणून घेते, परंतु मला पडद्यावर कामुक दिसण्याचा कंटाळा येतो! अशा प्रकारे मी म्हणेन की 'दरबान' हा एक वेगळा चित्रपट आहे आणि तो योग्य वेळी माझ्याकडे आला आहे."
फ्लोराची प्रचंड फॅन फॉलोइंग
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेषत: इन्स्टाग्रामवर फ्लोराची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.
हेही वाचा -शेतकरी बांधवांचे दुःख पाहून वेदना होतात - धर्मेंद्र
या 'दरबान' चित्रपटाचे दिग्दर्शन बिपिन नाडकर्णी यांनी केले असून यात शारिब हाश्मी, शरद केळकर, रसिका दुगल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट झी 5 वर उपलब्ध आहे.
हेही वाचा -एक दशकानंतर प्रियदर्शन आणि अक्षय कुमार येणार एकत्र