ETV Bharat / sitara

मी स्वतःला भाग्यवान समजते - सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर हिट चित्रपट तिच्या नावावर जमा आहेत. आपल्याला प्रतिभावंत आणि चतुरस्त्र दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आपण भाग्यवान असल्याचे ती मानते. तिचा कुली नं. १ हा वरुण धवनसोबतचा चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत आहे.

Sara Ali Khan
सारा अली खान
author img

By

Published : Dec 17, 2020, 7:57 PM IST

मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणामुळे खूश आहे. 'केदारनाथ' च्या २०१८च्या रिलीजपासून तिने अभिषेक कपूर, रोहित शेट्टी आणि इम्तियाज अली यासारख्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. आता तिचा डेव्हिड धवन दिग्दर्शित कुली नं. १ चा रिमेक रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. हा चित्रपट १९९५ मध्ये आलेल्या गोविंदा आणि करिश्माचा रिमेक आहे.

बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी असलेली सारा म्हणाली, "मला वाटतं की मी भाग्यवान आहे आणि मला विशेषाधिकार मिळाला आहे. मला वाटते की सिनेमा हा दिग्दर्शकाचे माध्यम आहे आणि मला भेटलेले सर्व दिग्दर्शक अष्टपैलू आणि प्रतिभावंत होते, त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे."

हेही वाचा - संजना सांघीने 'ओम' वर काम केले सुरू

२५ वर्षीय अभिनेत्री सारा म्हणाली, "मी फक्त एवढेच म्हणेन की मी कृतज्ञ आणि आभारी आहे. मला आशा आहे की मला पूर्वीसारखेच सर्जनशील लोकांसोबत काम करण्याची संधी मिळत राहील."

हेही वाचा - रणवीर सिंगने सांगितला आपल्या यशाचा मंत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.