ETV Bharat / sitara

'न्यूटन'मध्ये काम केल्यामुळे खूश आहे - पंकज त्रिपाठी

author img

By

Published : Nov 6, 2020, 1:51 PM IST

'न्यूटन' या चित्रपटात नक्षलग्रस्त भागात निवडणुकीच्या ड्युटीवर तैनात असलेल्या अधिकाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली होती. हा चित्रपट आजही निवडणुकीसाठी ड्यूटीवर जाणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे, असे पंकज त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी

मुंबई - अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी २००७मध्ये आलेल्या 'न्यूटन' चित्रपटात मतदान अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. आजही जे लोक निवडणुकीच्या ड्युटीवर काम करतात त्यांना मी साकारलेल्या भूमिकेला ते स्वतःला जोडून घेतात, असे त्रिपाठी यांनी म्हटलंय. या चित्रपटात राजकुमार राव याची प्रमुख भूमिका होती.

२०१८ च्या ऑस्करमध्ये अमित व्ही.मसूरूरचा 'न्यूटन' हा चित्रपट भारताकडून अधिकृतपणे नामांकित झाला होता. हा चित्रपट निवडणुकीसाठी नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या सरकारी अधिकारी राजकुमार राव याच्या भोवती फिरतो.

पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) सहाय्यक कमांडंटची भूमिका साकारली होती. हे मतदान केंद्राच्या सुरक्षिततेवर कार्यरत होते.

सध्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जे लोक छपरामध्ये ड्युटीवर आहेत त्यांच्यासाठी न्यूटन हा चित्रपट प्रेरणा स्रोत आहे.

निवडणुकीसाठी प्रशिक्षण देताना न्यूटन हा चित्रपट २५०० अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला होता. यातील अधिकाऱ्यांशी पंकज त्रिपाठी भेटले असता त्यांनी न्यूटन हा चित्रपट पाहून जे लोक ड्युटीपासून पळून जाण्याचा विचार करत होते, त्यांच्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.