नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आपल्या हक्कासाठी आंदोलन करीत आहे. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही यात मार्ग निघालेला नाही. यामध्ये सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन हे आंदोलन थांबवावे असे अभिनेता धर्मेंद्र यांनी म्हटले आहे.
धर्मेंद्र यांनी लिहिली भावूक पोस्ट
दिल्लीत आलेल्या शेतकऱ्यांमध्ये पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. धर्मेंद्रदेखील पंजाबमध्ये शेती करतात. आपल्या फार्म हाऊसभोवती असलेल्या शेतीत ते अनेक पिके घेतात. याचे फोटो आणि व्हिडिओ ते आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करीत असतात. आज त्यांनी एक शेतकऱ्यांसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिलंय, ''माझ्या शेतकरी बांधवांचे दु: ख पाहून मला खूप वेदना होत आहेत. सरकारने काहीतरी वेगवान करावे.''
हेही वाचा -कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग सातपुड्यात होणार
धर्मेंद्र यांची पत्नी मुलगा आहे खासदार
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सिने क्षेत्रातील अनेकांनी पाठिंबा दिला आहे. धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी देओल दोघेही भाजपचे खासदार आहेत. अशावेळी धर्मेंद्र यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे याचे काय पडसाद उमटतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.