मुंबई - प्रियदर्शन यांच्या हंगामा - 2 या हास्य चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी परेश रावल, शिल्पा शेट्टी व मिझान यांनी आज (दि. 4 ऑक्टोबर) मुंबईतून हिमाचल प्रदेशच्या मनालीसाठी प्रस्थान केले आहे. 2003 साली आलेल्या हंगामा या कॉमेडी चित्रपटाचा सिक्वल लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. 2003 सालच्या हंगामा चित्रपटातही परेश रावल यांनी काम केले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शिल्पा शेट्टी-कुंद्राने एक व्हिडिओ तिच्या इन्साग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये अभिनेते परेश रावल, प्रणिता सुभाष तसेच निर्माते रतन जैन हे दिसत आहेत. कोरोनाचे नियम पाळत मास्क लावत हे हंगामा चित्रपटाची टीमने एका खासगी हेलिकॉप्टरने मनालीकडे झेप घेतली.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रीयदर्शन यांनी सांगितले होते की, एका चित्रपटाचे शेवटच्या बारा दिवसांचे चित्रीकरण राहिले आहे. मात्र, त्यानंतर मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी घोषित करण्यात आली. 2003 साली प्रदर्शित झालेल्या हंगामा चित्रपटात परेश रावल, शोमा आनंद, अक्षय खन्ना, आफताब शिवदासानी व रिमी सेन हे मुख्य भूमिकेत होते.
हेही वाचा - करण जोहरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, दिले 'हे' आश्वासन