ETV Bharat / sitara

डिनर डेटनंतर दिसला हृतिक रोशन, 'मिस्ट्री गर्ल'बद्दल चाहत्यांना उत्सुकता - पाहा व्हिडिओ - हृतिक रोशनची मिस्ट्री गर्लसोबत डिनर डेट

शुक्रवारी रात्री हृतिक मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाला. हृतिक सोबत अनेक मित्रही होते. पण ज्या प्रकारे त्याने मिस्ट्री गर्लचा हात धरला आणि तिला आपल्या कारपर्यंत नेले त्यामुळे त्याच्या डेटिंग लाइफबद्दल अटकळ बांधली जात आहे.

डिनर डेटनंतर दिसला हृतिक रोशन
डिनर डेटनंतर दिसला हृतिक रोशन
author img

By

Published : Jan 29, 2022, 1:48 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या एका मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. या व्हिडिओमध्ये, हृतिक एका रहस्यमय मुलीचा हात धरून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे आणि त्याच्या हावभावामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढीस लागली आहे.

शुक्रवारी रात्री हृतिक मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाला. हृतिक सोबत अनेक मित्रही होते. पण ज्या प्रकारे त्याने मिस्ट्री गर्लचा हात धरला आणि तिला आपल्या कारपर्यंत नेले त्यामुळे त्याच्या डेटिंग लाइफबद्दल अटकळ निर्माण झाली आहे.

कंगना रणौतसोबत त्याचे प्रेमप्रकरण चर्चेत आल्यानंतर तो अद्यापही सिंगल आहे. त्याच्या आयुष्यात कोणी खास आहे की नाही याचा निष्कर्ष काढणे खूप घाईचे ठरेल. मात्र रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना सोबतच्या मुलीला त्याने ज्या प्रकारे हौशी फोटोग्राफर्सपासून वाचवले व थेट गाडीत बसवून दिले त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा मात्र सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर हृतिकचे मिस्ट्री गर्लसोबतचे व्हिडीओ आणि फोटो आल्यानंतर लवकरच डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते. मुलीने मास्क घातलेला असल्याने तिच्या ओळखीचा अंदाज लावण्यात चाहते व्यस्त होते. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये नेटिझन्सनी हृतिकची चुलत बहीण पश्मिना रोशनला देखील पाहिले आहे.

चित्रपटाच्या आघाडीवर हृतिक रोशन आगामी 'विक्रम वेधा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सैफ अली खान आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत. त्याच्याकडे दीपिका पदुकोणसोबत सिद्धार्थ आनंदचा 'फायटर'ही आहे.

हेही वाचा - काश्मीरच्या थंडीचा आनंद घेताना सारा आणि इब्राहिम अली पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.