मुंबई - अभिनेता हृतिक रोशनने जवळपास ९७.५ कोटी रुपयांची दोन अपार्टमेंट खरेदी केली आहेत. या अपार्टमेंट्सचे वैशिष्ट्य म्हणजे, इथून अरबी समुद्राचे सुंदर दृष्य दिसू शकेल.
यातील एक अपार्टमेंट डुप्लेक्स पेंटहाउस आहे आणि दुसरे एक मजली घर आहे.
एका आघाडीच्या वृत्तपत्रानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला हा व्यवहार पूर्ण झाला होता. याची एकूण किंमत जवळपास ९७.५ कोटी रुपये आहे. जुहू-वर्सोवा लिंक रोडवर असलेल्या १६ मजल्याच्या इमारतीच्या १४ व्या आणि १५ व्या मजल्यावर ही दोन अपार्टमेंट्स आहेत.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या अहवालानुसार, या अपार्टमेंटमधून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते आणि याचे एकूण क्षेत्रफळ 38,000 चौरस फूट इतके आहे. शिवाय त्याखाली १० पार्किंग स्पॉट्स आहेत.
२,५३४ चौरस फुटांपर्यंत पसरलेल्या डुप्लेक्ससाठी हृतिकने ६७.५ कोटी रुपये तसेच १४ व्या मजल्याच्या अपार्टमेंटसाठी ३० कोटी रुपये भरल्याची माहिती आहे.