मुंबई - सुपरस्टार सलमान खान आणि कॅटरिना कैफ त्यांच्या सुपरहिट टायगर फ्रॅंचायझीमधून टायगर आणि झोया या व्यक्तीरेखा साकारण्यासाठी पुन्हा सज्ज होत आहेत. 'टायगर 3' चित्रपटाचे कलाकार मार्च २०२१ पासून शुटिंगला सुरुवात करणार आहेत.
सलमान खान सध्या 'अंतिम' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र झाला आहे. यापूर्वीही त्याने 'किक 2' आणि 'कभी ईद कभी दिवाळी'च्या चित्रपटांची घोषणा केली आहे. ताज्या बातम्यांनुसार, सलमान पुढील वर्षी मार्चच्या तिसर्या आठवड्यापासून अली अब्बास जफरच्या 'टायगर 3' साठी कॅटरिनासोबत शूटिंग करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईपासून सुरू होणार असल्याचे समजले आहे आणि अंतिम शेड्यूलसाठी मुंबईला परतण्यापूर्वी दुसऱ्या शेड्यूलसाठी टीम मध्य-पूर्वेकडे रवाना होईल.
सलमान आणि कॅटरिनाने बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून एक रोमँटिक इतिहास असलेले नाते असूनही दोघे एकमेकांसोबत निरोगी संबंध शेअर करतात.
हेही वाचा -आयुष्यमान-वाणीने ४८ दिवसात आटोपले 'चंडीगड करे आशिकी'चे शुटिंग
'टायगर 3' हे सध्याचे शीर्षक असले तरी ते पुढे जाऊन बदलले जाऊ शकते.
हेही वाचा -रणबीरसोबत कधी लग्न करणार? आलिया भट्टने दिले उत्तर