ETV Bharat / sitara

मोदींनी 'पीएम मोदी' बायोपिक पाहिला का? विवेक ओबेरॉयनं दिलं अस उत्तर - vivek oberoi

शुक्रवारी हा चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला असून चित्रपटाला चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. अशातच मोदींनी स्वतः आपल्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहिला का? हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

मोदींनी 'पीएम मोदी' बायोपिक पाहिला का?
author img

By

Published : May 26, 2019, 8:17 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामान्य चहावाल्यापासून पंतप्रधान होईपर्यंतचा खडतर प्रवास आता रुपेरी पडद्यावर उलगडला आहे. 'पीएम मोदी' चित्रपटातून मोदींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या आणि न ऐकलेल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने मोदींची भूमिका साकारली आहे.

शुक्रवारी हा चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला असून चित्रपटाला चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. अशातच मोदींनी स्वतः आपल्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहिला का? हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. आता विवेकने स्वतः दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

देशात सध्या अनेक महत्त्वाची कामं सुरू आहेत. मोदी हे अतिशय विनम्र आणि मोठ्या मनाचे आहेत. त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते मला नक्की फोन करतील, असा विश्वास व्यक्त करत मोदी लवकरच हा चित्रपट पाहतील, असे संकेत विवेकने दिले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून माझा अभिनय हा हुबेहुब मोदींप्रमाणे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे, असे सांगत विवेकने प्रेक्षकांचे आभार मानले.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.