ETV Bharat / sitara

फ्राइडे क्लॅशेस: एकमेकांविरुध्द उभे ठाकले 'बिग बॅनर'चे महाचित्रपट - राधे विरुद्ध एस सत्यमेव जयते 2

गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर सिनेमांचे प्रदर्शन थांबले. थिएटर्स बंद पडली. या काळात जे चित्रपट रिलीजसाठी तयार होते त्यांनी आपले रिलीज पुढे ढकलले. आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू थिएटर्स उघडू लागली असली तरी बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्पर्धेचे आव्हान उभे ठाकले आहे. आगामी काळात ज्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होऊ शकते त्यावर एक नजर टाकूयात.

फ्राइडे क्लॅश
author img

By

Published : Feb 25, 2021, 6:57 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये अपवादानेच सिनेमा रिलीज झाला. सबंध वर्ष सिनेमापासून प्रेक्षक दूरच राहिले. काही चित्रपटांनी ओटीटी रिलीजचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आणि एकेक चित्रपटांची रिलीज तारीख जाहीर होऊ लागल्या. शुक्रवारी रिलीज होत असल्यामुळे आता या दिवशी रिलीज होणाऱ्या चित्रपटांची संख्याही वाढू लागली आणि त्याबरोबरच बॉक्स ऑफिसवरील स्पर्धाही.

बॉक्स ऑफिसवरील संघर्ष टाळला पाहिजे असे व्यापार विश्लेषकांना वाटते. सध्याचा हा काळ अशी स्पर्धा करण्याचा नाही. मुळात थिएटरमध्ये प्रेक्षक येण्याची वाणवा असताना ही स्पर्धा होत असल्याची खंत व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांनी बोलून दाखवली आहे.

यावर्षी मोठ्या संख्येने प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांबद्दल बोलताना व्यापार विश्लेषक कोमल नहाटा यांना वाटते की सर्वच हे चित्रपटगृहात वेळेवर येऊ शकणार नाहीत. “सर्व काही घोषणांच्या अनुषंगाने चालणार नाही आणि बहुतेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाहीत. अखेर केवळ चांगला आशय असलेले चित्रपट चांगले काम करतील. याक्षणी स्टारकास्टमुळे काहीच फरक पडत नाही,” असे नहाटा म्हणाले.

निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक करण राजदान, ज्याचा हिंदुत्व हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे, चित्रपटाच्या आशयामुळे सर्व फरक पडतो यावर सहमत आहे. "मला असे वाटते की चांगले चित्रपट चालतील आणि वाईट चित्रपट चालणार नाहीत. जे लोकांसोबत आणि लोकांच्या मनाशी जोडले जातात ते चित्रपट चालतील. आपण चित्रपट प्रदर्शित करता तेव्हा काही फरक पडत नाही. परीक्षा किंवा आयपीएल दरम्यान एखादा चांगला चित्रपट प्रदर्शित झाल्यास, तो अजूनही चालतो. जर ते चांगले नसतील, आणि जरी आपण चित्रपट सुरुवातीच्या आठवड्यात प्रदर्शित केले तरी ते चालणार नाही, " असे निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक करण राजदान म्हणाले. त्यांचा 'हिंदुत्व' हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे.

बॉक्स ऑफिसवर संघर्ष करण्यासाठी उभ्या ठाकलेल्या चित्रपटांची यादी पुढील प्रमाणे...

पृथ्वीराज विरुद्ध जर्सी (5 नोव्हेंबर)

दिवाळी विकेंडला रिलीज होणाऱ्या या दोन चित्रपटांची टक्कर यावर्षीची स्रवा मोठी समजली जात आहे. या दोन्ही पैकी एका चित्रपटाने तारी मागे घेतली नाही अथवा पुढे ठकलली नाही तर संघर्ष अटळ आहे. अक्षय कुमार 'पृथ्वीराज'मध्ये मानुषी छिल्लरसोबत झळकणार आहे तर क्रिकेटवर आधारित 'जर्सी' हा चित्रपट आहे. यात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या भूमिका आहेत.

मुंबई सागा विरुद्ध / संदीप और पिंकी फरार (१ मार्च)

संजय गुप्ता यांच्या नवीन अंडरवर्ल्ड ड्रामा 'मुंबई सागा'मध्ये जॉन अब्राहम, इमरान हाश्मी, सुनील शेट्टी, काजल अग्रवाल, रोहित रॉय, अंजना सुखानी, महेश मांजरेकर आणि प्रेतिक बब्बर यांचा समावेश आहे. त्याच दिवशी दिवाकर बॅनर्जी यांचे ब्लॅक कॉमेडी ड्रामा ''संदीप और पिंकी फरार'' असून परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यात प्रमुख भूमिका आहेत.

राधे विरुद्ध एस सत्यमेव जयते 2 (ईद विकेंड)

सलमान खानचे चाहते राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाईची प्रतिक्षा करीत आहेत आणि सुपरस्टारने फार पूर्वी ईदच्या विकेंडला रिलीज करणार असल्याची घोषणा केली आहे. यात दिशा पाटणीचीही भूमिका आहे. हा चित्रपट १३ मे रोजी रिलीज होणार आहे. तर जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते १४ मे रोजी रिली होणार आहे.

गंगूबाई काठियावाडी विरुद्ध राधे श्याम (30 जुलै)

आलिया भट्टचा आगामी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा सामना प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या राधे श्याम चित्रपटाशी होणार आहे. गंगूबाई काठियावाडीमध्ये आलीया भट्टची भूमिका १९६०च्या दशकात कामठीपुरा येथील सर्वात शक्तिशाली, प्रिय आणि आदरणीय मॅडम गंगूबाईची आहे.एसएलबीच्या चित्रपटाला बाहुबली स्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित रोमँटिक राधे श्याम चित्रपटाशी सामना करावा लागेल, हा चित्रपट बहुभाषिक असून हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल

शेरशाह विरुद्ध मेजर (२ जुलै)

दोन्ही चित्रपट देशभक्ती आणि वास्तविक जीवनात सैनिकी पराक्रमाबद्दल आहेत. सिद्धार्थ मल्होत्राने शेरशाहमध्ये परमवीर चक्र प्राप्तकर्ता आणि कारगिल युद्धाचा नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली असून यात कियारा अडवाणीची भूमिका आहे. मेजर हा बहुभाषिक चित्रपट आहे जो तेलुगू सुपरस्टार महेश बाबूच्या निर्माता म्हणून पदार्पणाचा चित्रपट आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या पराक्रमावर आधारित हा चित्रपट आहे.

हेही वाचा - कंगनासोबत वादग्रस्त ई-मेल प्रकरणी हृतिक रोशनची होणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.