ETV Bharat / sitara

'कोका'! 'खानदानी शफाखाना'मधील पहिलं गाणं प्रदर्शित, सोनाक्षीच्या डान्सची झलक - varun sharma

सोनाक्षीचा खानदानी शफाखाना हा चित्रपट एका आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित आहे. हा चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'खानदानी शफाखाना'मधील पहिलं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Jun 28, 2019, 3:03 PM IST

मुंबई - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच 'खानदानी शफाखाना' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरूण शर्मा आणि सिंगर बादशाहदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

कोका असं या गाण्याचं शीर्षक आहे. २ मिनीट ५३ सेकंदाच्या या गाण्यात सोनाक्षीचा खास डान्स पाहायला मिळत आहे. तर गाण्यात बादशाह आणि वरूण शर्मा यांचीही झलक पाहायला मिळत आहे. या गाण्याला जसबीर जस्सी, बादशाह आणि भानुशाली यांनी आवाज दिला आहे.

सोनाक्षीचा खानदानी शफाखाना हा चित्रपट एका आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित आहे. हा चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा नेहमीच्या रटाळ प्रेमकथांपेक्षा वेगळी आणि विनोदी असल्यानं प्रेक्षकांना काहीसं वेगळेपण या चित्रपटात पाहायला मिळेल हे नक्की. शिल्पी दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, महावीर जैन आणि म्रद्यदीप सिंह लांबा यांनी केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.