ETV Bharat / sitara

सोनाक्षीच्या 'खानदानी शफाखाना'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित - varun sharma

'खानदानी शफाखाना' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आता प्रदर्शित करण्यात आलं आहे.या पोस्टरमध्ये सोनाक्षीसोबतच अभिनेता वरुण शर्मा, अन्नु कपूर आणि रॅपर बादशाहाची झलकदेखील पाहायला मिळत आहे.

सोनाक्षीच्या 'खानदानी शफाखाना'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Jun 19, 2019, 8:03 PM IST

मुंबई - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या 'दबंग ३'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. अशातच तिचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'खानदानी शफाखाना' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आता प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या पोस्टरमध्ये सोनाक्षीसोबतच अभिनेता वरुण शर्मा, अन्नु कपूर आणि रॅपर बादशाहाची झलकदेखील पाहायला मिळत आहे. मात्र, पोस्टरमधील बहुतेक कलाकारांचे चेहरे झाकलेले आहेत. 'मैं जितना बोलूंगी लोगों को उतनी ही शर्म आनी है', अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली आहे.

khandani shafakhana, sonakshi sinha
सोनाक्षीच्या 'खानदानी शफाखाना'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

दरम्यान चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या २ दिवसात चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं तरण आदर्श यांनी ट्विट करत सांगितलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ता यांनी केलं आहे. तर भूषण कुमार, महावीर जैन आणि म्रीघदीप सिंग लंबा यांची निर्मिती आहे. २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.