मुंबई - बहुचर्चित हॉरर कॉमेडी कॅटेगरीतील लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट येत्या ९ नव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यापासून बॉलिवूडमध्ये आपली एन्ट्री केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने तृतीयपंथीचे पात्र साकारले आहे. या पात्राच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील काही घडामोडी समोर आणण्याचा एक प्रयत्न केल्याचे राघव लॉरेन्सने म्हटले आहे.
लक्ष्मी बॉम्ब हा तामिळ चित्रपट मुनि 2 : कंचनाचा रिमेक असून यात राघव लॉरेन्सची मुख्य भूमिका होती. त्याचाच हिंदी रिमेक येत्या ९ नव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले असून यात अक्षय कुमारने एका तृतीयपंथीचे पात्र साकारले आहे. याबाबत बोलताना दिग्दर्शक राघव लॉरेन्स म्हणाले, मला तृतीयपंथी समाजाची परिस्थिती या कथेतून मांडायची होती. याद्वारे तृतीयपंथी समाजाबाबत एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे राघवने सांगितले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
पुढे बोलताना राघव म्हणाला, 'मी एक ट्रस्ट चालवतो आणि काही तृतीयपंथीयांनी माझ्याकडे मदतीसाठी संपर्क साधला होता. जेव्हा मी त्यांची अडचण ऐकली तेव्हा ते प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवे असे मला वाटले'. आधी कंचनाच्या पात्रातून आणि आता या चित्रपटाच्या माध्यमातून मी ते सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर, मला काय बोलायचे होते, प्रेक्षकांना समजेल अशी मला आशा आहे. हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या शैलीतून माध्यमातून पहिल्यांदाच मी तृतीयपंथीयांबाबत एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्र अशाप्रकारे तयार केले गेले आहे की प्रेक्षक त्यांच्यातील विभिन्नतेचा आनंद घेऊ शकतात. असे लॉरेन्स म्हणाला.
"कांचना तमिळमध्ये रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे तृतीयपंथीयांकडून खूप कौतुक झाले. ते थेट माझ्या घरी आले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. म्हणून हिंदीमध्ये जेव्हा अक्षय कुमार ही भूमिका साकारत आहेत, तेव्हा मला विश्वास आहे की हा संदेश आणखी व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. अक्षय कुमारने ही भूमिका स्वीकारल्याबद्दल त्याचे विशेष आभार, असेही दिग्दर्शक राघव लॉरेन्सने म्हटले आहे.
या चित्रपटात अक्षय कुमारसह कियारा अडवाणी, आयशा रजा मिश्रा, तुषार कपूर आणि शरद केळकर यांची मूख्य भूमिका आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिजनी+हॉटस्टारवर ९ नोव्हेंबरला रिलीज होत आहे.
हेही वाचा - 'बुर्ज खलिफा' गाण्यासाठी कियाराने केले वाळवंटात अनवाणी पायाने डान्स