ETV Bharat / sitara

युक्रेन युध्दातील भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने फरहान अख्तर गहिवरला

युक्रेनमधील रशियन हल्ल्यात ठार झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल अभिनेता फरहान अख्तरने शोक व्यक्त केला आहे. ट्विट करून त्यांनी हे आवाहन केले आहे.

author img

By

Published : Mar 2, 2022, 11:53 AM IST

फरहान अख्तर
फरहान अख्तर

मुंबई - रशिया आणि युक्रेनमधील युद्ध बुधवारी सातव्या दिवशीही सुरूच आहे. युक्रेनमध्ये आतापर्यंत अनेकांचे प्राण आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. युद्धाच्या सहाव्या दिवशी युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाला. या बातमीने संपूर्ण देश हादरला आहे. मृत विद्यार्थ्याच्या घरावर शोककळा पसरली आहे. अनेक भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले असून ते मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अभिनेता फरहान अख्तरने एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

फरहान अख्तरने व्यक्त केला शोक
फरहान अख्तरने व्यक्त केला शोक

फरहान अख्तरने ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. फरहानने मंगळवारी आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले की, ''एक भारतीय विद्यार्थी आता युक्रेनमधील हल्ल्याचा बळी ठरला आहे.. कुटुंबासाठी दु:ख आहे.. त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना..आशा आहे की आमचे सर्व नागरिक सुरक्षित आहेत. आशा आहे की लवकरच ते घरी परततील.''

आपल्या माहिती करता सांगायचे तर दरवर्षी हजारो विद्यार्थी भारतातून वैद्यकिय शिक्षणासाठी युक्रेनला जातात. तिथेच राहून आपले शिक्षण पूर्ण करतात आणि भारतात येऊन मेडिकल प्रॅक्टीस करतात. भारतातील खासगी मेडिकल कॉलेजपेक्षा युक्रेनमधील शिक्षण कितीतरी पटीने स्वस्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल युक्रेनला जाण्याकडे असतो.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांबाबत अपडेट देताना सांगितले की, रशियन हल्ल्यामुळे युक्रेनवासीयांना त्रास होत आहे. एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू दुःखद आहे. मृत विद्यार्थी कर्नाटकातील चालगेरीचा रहिवासी होता, त्याचे नाव नवीन शेखरप्पा ग्यानगौदार होते.

फरहान खानने नुकतेच त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत लग्न केले आहे. फरहान-शिबानीच्या लग्नाला बॉलीवूड स्टार्ससह नातेवाईक आणि काही जवळच्या मित्रांनीही हजेरी लावली होती. या जोडप्याने चाहत्यांसाठी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, जे त्यांना खूप आवडले होते.

हेही वाचा - Hbd टायगर श्रॉफ: आगामी चित्रपटांमध्ये अचाट अॅक्शनसाठी टायगर सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.