ETV Bharat / sitara

राज कपूर पुण्यतिथी: राष्ट्रपतींनी स्वतः स्टेजवरुन उतरुन दिला होता पुरस्कार - राज कपूर पुण्यतिथी

1948 साली वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी स्वतःचा एक स्टुडिओ सुरु केला. याला त्यांनी आरके स्टुडिओ असे नाव दिले. 'आग' या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. आवारा, श्री 420, मेरा नाम जोकर आणि संगम हे राज कपूर यांचे एव्हरग्रीन चित्रपट आहेत.

raj kapoor
राज कपूर
author img

By

Published : Jun 2, 2020, 8:12 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे 'शोमॅन' म्हणून ओळख असणाऱ्या राज कपूर यांची आज पुण्यतिथी आहे. 32 वर्षांपूर्वी राज कपूर यांचे निधन झाले. मात्र, सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल आजही ते चाहत्यांच्या आठवणीमध्ये आहेत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त चाहत्यांनी त्यांना 'फर्स्ट सुपरस्टार' आणि 'शोमॅन' म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.

राज कपूर हे अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन यांचा परिपूर्ण 'संगम' होते, असे एका चाहत्याने ट्विट केले आहे. पुण्यतिथीनिमित्त अनेकांनी राज यांचे जुने फोटो शेअर केले. सोबतच त्यांच्या कलेचे कौतुक करत त्यांनी काम केलेल्या अनेक चित्रपटांविषयीची माहिती चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

राज कपूर हे पृथ्वीराज आणि रामसरणी यांचे थोरले पुत्र होते. 1935 साली 'इंकलाब' या सिनेमातून ते पहिल्यांदा पडद्यावर झळकले. 1947 साली आलेल्या 'नीलकमल' सिनेमातून त्यांनी खऱ्या अर्थाने सिनेसृष्टीत प्रवेश केला. या सिनेमात त्यांच्यासोबत मधुबाला यांनी भूमिका साकारली होती.

1948 साली वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी स्वतःचा एक स्टुडिओ सुरु केला. याला त्यांनी आरके स्टुडिओ असे नाव दिले. 'आग' या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. आवारा, श्री 420, मेरा नाम जोकर आणि संगम हे राज कपूर यांचे एव्हरग्रीन चित्रपट आहेत.

राज कपूर यांनी 1946 साली क्रिष्णा कपूर यांच्याशी विवाह केला. त्यांना रणधीर, रितू, ऋषी, रिमा आणि राजीव कपूर अशी पाच मुले होती. यातील रितू आणि ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे.

2 मे 1988 रोजी राज कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, प्रकती अस्वस्थ असल्याने ऑक्सिजन मास्क लावून ते या कार्यक्रमात सहभागी झाले. पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा राज कपूर उठू शकले नाहीत. त्यांची अस्वस्थता पाहून तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमा हे राज यांना पुरस्कार देण्यासाठी स्वतः स्टेजवरुन खाली उतरले. 2 जून 1988 रोजी राज कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.