नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कला विश्वातही पसरला आहे. तब्बल 15 दिवस कोरोनाशी झुंज दिल्यानंतर एमी पुरस्कार विजेता गायक ॲडम शेलसिंगर यांचे बुधवारी निधन झाले आहे. ते 52 वर्षाचे होते.
ॲडम शेलसिंगर यांना कोरोनाची लागण झाल्या नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत आणखी अडचणी निर्माण झाल्या होत्या.
हॉलिवूड अभिनेते टॉम हँक्स यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. टॉम हँक्स यांना देखील कोरोना ची लागण झाली होती. मात्र, ते आता पूर्ण बरे झाले आहेत.
ॲडम शेलसिंगर यांना 10 एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यापैकी त्यांना 3 पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी बऱ्याच गितांच लेखन केलं आहे. यापैकी द क्रेझी एक्स गर्लफ्रेंड हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं.