मुंबई - एकता कपूरला अलिकडेच एका आघाडीच्या कंपनीने आयोजित केलेल्या संमेलनात 'वूमन ऑफ दी इयर २०२०' या प्रेरणादायी लिडर म्हणून सन्मानित करण्यात आले. आणखी एका प्रमुख फर्मने व्हाइट पेज लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२० चा समारोप केला, जिथे ती मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होती. तिच्या अल्ट बालाजी या ब्रँडला या वर्षाचा सर्वात प्रशंसित ब्रँड म्हणून टॅग केले गेले होते.
हेही वाचा - माझ्यासाठी हे एक विशेष वर्ष - नवाजुद्दीन सिद्दीकी
२०२० च्या भारतातील १०० सर्वाधिक प्रतिष्ठित ब्रँडच्या पहिल्या यादीत अल्ट बालाजी या ब्रँडला स्थान देण्यात आले आहे. एकता आणि अल्ट बालाजी प्रेक्षकांसाठी छान आशय सादर करत आहेत. लॉकडाउन दरम्यान, अल्ट बालाजीमध्ये 'मेन्टल हूड', 'कोड एम', ''बिच्छू का खेल', 'मुमभाई' यासह बरेच शो रिलीज झाले. त्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे.
हेही वाचा - 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरचे निधन
एकता प्रेक्षकांपर्यंत नवीन आशय पोहोचविण्यासाठी नेहमीच तयार असते. तिने ऑफर केलेल्या वेब-मालिकेची स्वतःची वेगळी शैली आहे. त्याची पटकथा, दिग्दर्शनाचा मार्ग, कलाकार सर्व परिपूर्ण आहेत. यामुळे अल्ट बालाजीच्या सर्व शोला चांगले यश मिळाले असून या सर्वांमुळे एकता या पुरस्कारासाठी पात्र ठरली.