मुंबई - मार्च २०२० पासून भारतीय चित्रपटसृष्टीला मोठे ग्रहण लागले आहे. भारतातल्या असंख्या भाषेतील शेकडो चित्रपट बनून तयार आहेत. मात्र थिएटर्स सुरू नसल्यामुळे प्रदर्शित होऊ शकलेले नाही. अशात अनेक मोठ्या बॅनर्सनी नुकसान टाळण्यासाठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले. यामध्ये अमिताभ बच्चन(Amitabh Bachan) यांच्या 'गुलाबो सिताबो'पासून ते अक्षय कुमारच्या (Kumar Kumar) 'लक्ष्मी' पर्यंत निर्मात्यांनी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले. विद्या बालनचे (Vidya Balan) तर शकुंतला देवी आणि शेरनी हे दोन मोठे चित्रपट ओटीटावर रिलीज झाले. त्याचबरोबर बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार थिएटर व्यतिरिक्त ओटीटीकडे आपले लक्ष वळवत आहेत.
गेल्या एका वर्षात विद्या बालन, सुष्मिता सेन, लारा दत्ता,अभिषेक बच्चन,रिंकु राजगुरू, अभिषेक बच्चन यांसांरख्या अनेक स्टारनी ओटीटीवर पदार्पण केले आणि आता माधुरी दीक्षितचेही नाव या मालिकेत जोडले गेले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेटमफ्लिक्सची 'फाइंडिंग अनामिका' या सिरीजमधून ओटीटीवर पदार्पण करीत आहे. या मालिकेत माधुरी एका सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरीजमध्ये ती पत्नी आणि आई अशी वेगवेगळी व्यक्तीरेखा साकारणार आहे. करिश्मा कोहली आणि बेजॉय नंबियार यांनी या सीरीजचे दिग्दर्शन केले आहे.
दरम्यान माधुरीबद्दलची आणखी एक बातमी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिने आणखी एक ओटीटी प्रोजेक्ट साइन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'फाइंडिंग अनामिका' या सिरीजशिवाय माधुरीने अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचा प्रोजेक्ट करण्यास होकार दिला आहे. हा एक कौटुंबिक ड्रामा असलेला विषय आहे. 'मेरे पास माँ है' असे या चित्रपटाचे नाव असेल. 'मेरे पास माँ है' हा शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा १९७५ मध्ये रिलीज झालेल्या 'दीवार' या चित्रपटाचा डायलॉग आहे. 'मेरे पास माँ है' या प्रोजेक्टचे दिग्दर्शन आनंद तिवारी करणार आहेत. याआधी आनंदने २०१८ मध्ये 'लव्ह पर स्क्वेअर फूट' आणि २०२० मध्ये रिलीज झालेल्या 'तिकिट टू बॉलिवूड' आणि गेल्या वर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या 'बंदिश बँडिट्स' या संगीत सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आनंद आणि अमृतपाल सिंग बिंद्रा यांच्या 'स्टील अँड स्टिल मीडिया कलेक्टिव' या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. पुढील काही महिन्यात या चित्रपटाचे शुटिंग सुरू होईल.
हेही वाचा - 'उरी'ची अभिनेत्री 'ईडी'च्या रडारवर, यामी गौतमची ७ जुलैला होणार चौकशी